शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद ते धुळे मार्गासाठी अखेर कंत्राटदार मिळाले; महिनाभरात होणार काम सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 16:27 IST

सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या उर्वरित निविदा मंजूर होऊन दोन कंत्राटदारांना काम देण्याचे बुधवारी निश्चित झाले आहे. औरंगाबाद ते करोडीपर्यंतचे काम दिलीप बिल्डकॉनला तर करोडी ते भामरवाडीपर्यंतचे काम एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे, अशी माहिती नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) वरिष्ठ सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. 

औरंगाबाद : सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या उर्वरित निविदा मंजूर होऊन दोन कंत्राटदारांना काम देण्याचे बुधवारी निश्चित झाले आहे. औरंगाबाद ते करोडीपर्यंतचे काम दिलीप बिल्डकॉनला तर करोडी ते भामरवाडीपर्यंतचे काम एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे, अशी माहिती नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) वरिष्ठ सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. 

महिनाभरात या दोन्ही टप्प्यांचे काम सुरू होईल. प्रत्येकी १ हजार कोटी रुपयांचे हे काम असून, बोढरे ते धुळे या तिसर्‍या टप्प्यातील निविदा गेल्या वर्षीच मंजूर होऊन त्या कामाला सुरुवात झाली आहे. ९० कि़मी.च्या कामासाठी तीन टप्प्यात ३ हजार कोटींचा खर्च होत असून, यासाठी तिन्ही कंत्राटदार निश्चित झाले आहेत. दरम्यानच्या काळात येथील दोन प्रकल्प संचालक बदलून गेले. यातील यू. जे. चामरगोरे यांची दिल्लीला तर यशवंत घोटकर यांची नाशिकला बदली झाली. चामरगोरे यांच्या कार्यकाळातच महामार्ग क्र. २११ डीपीआर, भूसंपादनाचे जास्तीत जास्त काम झाले होते. वाल्मी संस्थेतील भूसंपादनाचा तिढादेखील त्यांच्या कार्यकाळात सुटला होता. 

औट्रम घाटाचा डीपीआर मंजूरऔट्रम घाटाचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) एनएचएआयच्या दिल्ली मुख्यालयाने मंजूर केला आहे. तीन महिन्यांत या कामाची निविदा निघण्याची शक्यता असून, साडेतीन हजार कोटी रुपयांतून ११ कि़ मी. बोगदा या घाटात निर्माण केला जाणार आहे. 

जालना रोड, बीड बायपास अधांतरीचकेंद्रीय अर्थसंकल्पात एनएचएआयच्या वाट्याला येणार्‍या अनुदानात जालना रोड आणि बीड बायपास या रस्त्यासाठी तरतूद झाली तरच हे काम होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला महामार्ग क्र.२११ आणि औट्रम घाटाबाबत महत्त्वाचे निर्णय झाले. जालना रोड आणि बीड बायपासच्या कामासाठी ७८९ कोटी रुपयांच्या खर्चाचा डीपीआर दीड वर्षापासून दिल्ली मुख्यालयात पडून आहे. अर्थसंकल्पात तरतूद झाली तरच केंद्राकडून थेट अनुदान मिळेल आणि या दोन्ही रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा होईल. वर्षभरापासून या दोन्ही प्रकल्पांचा ‘स्कोप’ कमी करण्याची चर्चा सुरू आहे. ८०० वरून ४०० कोटींत हे काम होईल काय, याची चाचपणी सुरू आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग