शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:19 IST

शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे मंगळवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता तो आता बुधवारी होणार आहे. जायकवाडीहून येणारे पाणी आणि मागणी यात दुप्पट फरक पडला आहे.

ठळक मुद्देरात्री उशिरा निर्णय : आजपासूनच अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे मंगळवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता तो आता बुधवारी होणार आहे. जायकवाडीहून येणारे पाणी आणि मागणी यात दुप्पट फरक पडला आहे.मागील सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर तब्बल पाच तास घसा कोरडा केला होता. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा विभागाला सक्त ताकीद दिली होती की, तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. महापालिकेतील सर्वोच्च सभागृहाचा आदेशही पाणीपुरवठा विभागाने पायदळी तुडविला. शहरातील एकाही वसाहतीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अधिकाºयांना यश आले नाही. शहरातील पन्नास टक्के वॉर्डांना ऐन कडक उन्हाळ्यात पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतोय. मोजक्याच वॉर्डांवर हा अन्याय होत असतानाही संबंधित वॉर्डाचे नगरसेवकही मूग गिळून आहेत. कधी तरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याशिवाय दुसरे काहीच करीत नाहीत. त्यातच सोमवारी रात्री उशिरा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा अपुरा होत आहे. उंच भागातील टाक्या भरण्यास त्रास होतो. त्यामुळे मंगळवार १ मेपासून शहरातील पाणीपुरवठाच एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. मंगळवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते त्यांना बुधवारी पाणी मिळेल. बुधवारी ज्या नागरिकांना पाणी देण्यात येणार होते त्यांना आता गुरुवारी आणि शुक्रवारचा पाणीपुरवठा शनिवारवर ढकलण्यात आला आहे.महापालिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका जुन्या शहरातील वॉर्डांना बसणार आहे. अगोदरच या भागातील वॉर्डांना पाचव्या दिवशी पाणी मिळत असे. मनपाने आणखी एक दिवसाची भर टाकली आहे.

टॅग्स :WaterपाणीMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादwater shortageपाणीकपात