शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

शहर पोलिसांची मॅरेथॉन नाकाबंदी; वाढत्या चोरींच्या घटनांमुळे चोकाचौकात तपासणी मोहीम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 2:21 PM

Aurangabad City police marathon Nakabandi गतवर्षीपासून सुरू असलेले वाहन चोरी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनांचे सत्र नवीन वर्षातही थांबायला तयार नाहीत.

ठळक मुद्देप्रत्येक पोलिस ठाणे अंतर्गत पाच ठिकाणी बॅरिकेट्स लावून नाका-बंदी केली जात होती. ज्या वाहनचालकाकडे वाहनमालकीची कागदपत्रे नाहीत अशी वाहने जप्त केली जात होती.

औरंगाबाद : गेल्या काही दिवसापासून शहरात मंगळसूत्र चोरी, दुचाकी चोरी आणि लुटमारीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत चौकाचौकात आणि विविध रस्त्यावर बॅरिकेड लावून नाकाबंदी केली. पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी या नाकाबंदित सहभागी झाले होते. 

गतवर्षीपासून सुरू असलेले वाहन चोरी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनांचे सत्र नवीन वर्षातही थांबायला तयार नाहीत. घटना घडल्यानंतर पोलिसाकडून नाकाबंदी केली जाते,याचा मात्र फारसा उपयोग होताना दिसत नाही. परिणामी मंगळसूत्र चोरी आणि दुचाकी चोरी करणारे मोकाट फिरत आहेत. वाढलेल्या घटनांमुळे शहरातील दुचाकीचालक त्यांच्या भावना बद्दल चिंतीत असतात. मंगळसूत्र चोरीला जाते की काय? या भीतीपोटी महिलांच्या मनातही चोरट्यांची धास्ती बसली आहे. 

या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी  २ वाजेपर्यंत शहराच्या सर्वच  रस्त्यावर चौकाचौकात नाकाबंदी केली. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, दिपक गिऱ्हे, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त आणि शहरातील १७ पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. प्रत्येक पोलिस ठाणे अंतर्गत पाच ठिकाणी बॅरिकेट्स लावून नाका-बंदी केली जात होती. येणाऱ्या-जाणाऱ्या संशयित वाहने अडवून ही वाहने  तपासली जात होती. ज्या वाहनचालकाकडे वाहनमालकीची कागदपत्रे नाहीत अशी वाहने जप्त केली जात होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसChain Snatchingसोनसाखळी चोरीtheftचोरी