शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद ‘बसपोर्ट’चा चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:23 IST

एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी घोषणा : निविदा प्रक्रियेतच अडकले बसपोर्ट, मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे.एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला. जानेवारी २०१६ मध्ये राज्यात औरंगाबादसह इतर काही शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्स्फर-लीज’ या तत्त्वावर बसपोर्ट बांधण्यात येणार आहे. बसपोर्ट जाहीर केल्याच्या वर्षभरानंतर म्हणजे जानेवारी २०१७ मध्ये एस. टी. महामंडळातर्फे औरंगाबादसह राज्यातील ९ शहरांत उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टसाठी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रिया दोन वर्र्षे उलटूनही काही केल्या पूर्ण होत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा विचार करून सुविधा उभारण्यात येणार आहे; परंतु त्यासाठी कोणी कंत्राटदार पुढे येत नसल्याचे दिसते. त्यामुळे ई-निविदेचा कालावधी वाढविण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. परिणामी निविदा प्रक्रिया सुरूच आहे.मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी बसपोर्ट उभारण्यासाठी नुसती कागदोपत्री प्रक्रिया सुरू असल्याने गेल्या अडीच वर्षांपासून बसस्थानकाच्या इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. बसस्थानकाच्या छताचे प्लास्टर उखडले असून, फलाटावरील फरशा, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ता आदींची दुरवस्था झालेली आहे. पावसाळा नसतानाही टाक्यांच्या गळतीने छताबरोबर खांब आणि भिंतीमध्ये पाणी झिरपण्याचे प्रकार होत आहेत.उभारणीला किती वर्षे?एसटी महामंडळाच्या प्रवाशांना लक्झरियस सेवा पुरविणे हा बसपोर्ट उभारणीमागील उद्देश आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बसपोर्ट उभारणीलाही मोठा कालावधी जाणार आहे. बसपोर्टमध्ये प्लॅटफॉर्म, सुसज्ज प्रतीक्षालय, पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह, चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह व स्वच्छतागृह, एटीएम, औषधालय, रिटेल शॉप, फूड कोर्ट, फूड काऊंटर, प्रशासकीय कार्यालय, व्हीआयपी रूम, कॉन्फरन्स रूम आदी सुविधा राहतील; परंतु दोन वर्षे होऊनही निविदा प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने बसपोर्टची उभारणी होऊन या सुविधा कधी मिळणार,असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.कोणीतरी पुढे आले पाहिजेबसपोर्टची निविदा काढलेली आहे. सर्वांसाठी ही निविदा आहे. उभारणीला उशीर होत असल्याचा काहीही संबंध नाही. बसपोर्ट उभारणीसाठी कोणीतरी पुढे आले पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबाद