औरंगाबादेत निवृत्त अधिका-याचा बंगला फोडून दहा लाखांचे दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:10 AM2018-02-23T00:10:55+5:302018-02-23T00:11:04+5:30

भारतभ्र्रमणसाठी गेलेल्या निवृत्त वृद्ध दाम्पत्याचा बंगला फोडून चोरट्यांनी ३० तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो चांदी आणि रोख ७ हजार रुपये, असा सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला.

Aurangabad breaks the bungalow of a retired officer in Aurangabad and robbed 10 lakh jewelery | औरंगाबादेत निवृत्त अधिका-याचा बंगला फोडून दहा लाखांचे दागिने पळविले

औरंगाबादेत निवृत्त अधिका-याचा बंगला फोडून दहा लाखांचे दागिने पळविले

googlenewsNext
ठळक मुद्देबेगमपुरा पोलीस ठाणे : पहाडसिंगपु-यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारतभ्र्रमणसाठी गेलेल्या निवृत्त वृद्ध दाम्पत्याचा बंगला फोडून चोरट्यांनी ३० तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो चांदी आणि रोख ७ हजार रुपये, असा सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पहाडसिंगपुरा येथे २१ फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, विश्वंभर वाघमारे हे भूमी अभिलेख विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांची पत्नी प्रतिभा वाघमारे शासकीय रुग्णालयातून निवृत्त झालेल्या परिचारिका आहेत. वाघमारे दाम्पत्य १० फेब्रुवारीला सहलीवर दक्षिण भारतात गेले होते. गावी जाताना त्यांनी शेजाºयांना घराकडे लक्ष देण्यास सांगितले. संधी साधून बंगल्याच्या दाराचा कडीकोंडा तोडून चोरटे आत घुसले. तळमजल्यामधील खोलीतील लोखंडी कपाट उचकटून चोरट्यांनी ३० तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो चांदीच्या वस्तू आणि रोख ७ हजार रुपये पळविले. २१ रोजी सकाळी शेजाºयांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी हैदराबादेत असलेल्या वाघमारे दाम्पत्याला फोन करून दाराचा कडीकोंडा तुटलेला असल्याचे सांगितले. त्यानंतर हे दाम्पत्य सहल अर्धवट सोडून आज सकाळी औरंगाबादेत परतले. त्यांनी या घटनेची माहिती बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक राजर्षी आडे यांना कळविली. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, निरीक्षक आडे, उपनिरीक्षक राहुल रोडे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
श्वान पथक, ठसे तज्ज्ञाला पाचारण
चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी काही पुरावे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्ही नाही..
बंगल्यात एवढे मोठे दागिने आणि रोख रक्कम ठेवून भारतभ्रमणासाठी गेलेल्या वाघमारे दाम्पत्याने सुरक्षेची कोणतीही उपाययोजना केली नव्हती. घराच्या परिसरात सीसीटीव्हीही अथवा सुरक्षारक्षकही त्यांनी नेमला नाही.
गुन्हे शाखेच्या अधिकाºयांकडून पाहणी
गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. चोरी करण्याच्या पद्धतीवरून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Aurangabad breaks the bungalow of a retired officer in Aurangabad and robbed 10 lakh jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.