शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर भावाला गतिमंद भावाची किडनी दान करण्याची परवानगी औरंगाबाद खंडपीठाने नाकारली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 12:38 IST

दोन्ही किडन्या निकामी झालेल्या डॉक्टर भावाला गतिमंद भावाची जुळणारी किडनी देण्याच्या परवानगी मागणारी याचिका आज खंडपीठाने फेटाळली. वैद्यकीय अहवाल व न्यायालयातील प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारावर न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देअवयवदान विषयक कायद्यातील कलम ९ (सी) नुसार गतिमंद व्यक्तीच्या अवयव दानास प्रतिबंध आहे. गतिमंद दात्याचा वैद्यकीय अहवाल व न्यायालयातील प्रत्यक्ष मुलाखत यावरून न्यायालयाने दिला निर्णय

औरंगाबाद : दोन्ही किडन्या निकामी झालेल्या डॉक्टर भावाला गतिमंद भावाची जुळणारी किडनी देण्याच्या परवानगी मागणारी याचिका आज खंडपीठाने फेटाळली. वैद्यकीय अहवाल व न्यायालयातील प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारावर न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी हा निर्णय दिला.

अवयवदान विषयक कायद्यातील कलम ९ (सी) नुसार गतिमंद व्यक्तीच्या अवयव दानास प्रतिबंध आहे. यामुळे दोन्ही ‘किडन्या’ निकामी झालेल्या २८ वर्षांच्या डॉक्टरच्या संपूर्ण कुटुंबाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना गतिमंद दात्याचा वैद्यकीय अहवाल व न्यायालयातील प्रत्यक्ष मुलाखत यावरून दाता अवयव दानास सक्षम नसल्याचे मत नोंदवत न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका फेटाळली.

काय होती याचिका नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील  येथील डॉ. अतुल पवार या डॉक्टरच्या दोन्ही ‘किडन्या’ निकामी झालेल्या आहेत. त्यांच्या एका भावाच्या किडन्या डॉ. अतुलशी जुळतात. म्हणून पवार कुटुंब औरंगाबादला बजाज रुग्णालयात आले आहे. मात्र, डॉ. अतुलचा ‘तो’ भाऊ गतिमंद असल्यामुळे रुग्णालयातील अवयवदानविषयक समितीने गतिमंद दात्याचे अवयवदान करण्यास ‘ह्युमन आॅर्गन अ‍ॅन्ड टिश्यूज ट्रान्सप्लान्ट अ‍ॅक्ट’ १९९४ च्या कलम ९ (१) नुसार प्रतिबंध असल्याचे कारण दर्शवून त्या दात्याची पुढील वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. यामुळे डॉ. अतुलचे वडील गणपतराव संभाजीराव पवार यांनी अ‍ॅड. पी.के. जोशी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. 

पवार यांचे दुर्दैवकिडनीदान कायद्याच्या फेर्‍यात अडकलेल्या डॉ. अतुलच्या दोन्ही किडन्या निकामी (फेल) झालेल्या आहेत. वडील ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्यामुळे ते किडनीदान करूशकत नाहीत. डॉ. अतुलच्या एका बहिणीला आईने किडनीदान केल्यामुळे आई एकाच किडनीवर जिवंत आहे. तसेच त्यांच्या ज्या बहिणीला ती ३ वर्षांची असताना आईने किडनीदान केले होते. तिच्याही दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. ज्या भावाच्या किडन्या अतुलशी जुळतात तो गतिमंद असल्यामुळे कायद्यानुसार त्याचे किडनीदान होऊ शकत नाही, तर शिक्षक असलेल्या भावाच्या किडन्या अतुलशी जुळत नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAurangabadऔरंगाबाद