- संतोष हिरेमठऔरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या व मुलगी समजून आईने शेतात फेकलेल्या टुणकी (जि. औरंगाबाद) येथील बाळावर घाटीत उपचार सुरू आहेत. केवळ १२०० ग्रॅम वजनाच्या या बाळाची प्रकृती गंभीर असून जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे.पाच मुलींनंतर सहाव्यांदाही मुलगी झाल्याचा समज करून या बाळाला सुनीता साळुंके या मातेनेच शेतात फेकून दिल्याची घटना ३० सप्टेंबरला घडली. गावात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याच्या चचेर्नंतर हे बाळ माझेच असल्याचे मातेने म्हटले. या बाळावर बुधवारपासून घाटीतील बालरोग विभागाच्या वॉर्ड-२५ मध्ये उपचार सुरू आहेत. येथे दाखल झाल्यापासून बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. बाळ वॉर्मरमध्ये असून त्याला जंतुसंसर्ग झाला आहे. कृत्रिम आॅक्सिजन देण्यात येत आहे. बालकल्याण समितीने केअर टेकर म्हणून भारतीय समाजसेवा केंद्रातील एक आया घाटीत पाठविली आहे.प्रतिमिनिट ५ लिटर आक्सिजन, प्रतिजैविकेचार दिवसांच्या या बाळाला प्रतिमिनिट ५ लिटर आॅक्सिजन लागत आहे. हृदयाची गती, रक्तदाब योग्य राहण्यासाठी उच्च प्रतिजैविके (हायर अँटीबायोटिक) देण्यात येत आहे.अति कमी वजनाचे बाळघाटीचे प्रभारी बालरोग विभागप्रमुख डॉ. अमोल सूर्यवंशी म्हणाले, ‘हे बाळ अति कमी १२०० ग्रॅम वजनाचे आहे. २८ ते ३० आठवड्यांनंतर बाळाचा जन्म झाल्याचे दिसते. जन्मताच फेकून दिल्याने जंतुसंसर्ग झाला, हे सांगता येणे कठीण आहे.’ डॉ. शिल्पा पवार म्हणाल्या, बाळाची प्रतिकारशक्ती कमी आहे. औषधोपचार सुरू आहे.
‘नकुशी’ समजून टाकलेले ‘ते’ बाळ ऑक्सिजनवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 03:18 IST