शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

औरंगाबादने कोरोनाच्या साप्ताहिक पाॅझिटिव्हिटीमध्ये मुंबई, पुणे, नागपूरलाही मागे टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 18:12 IST

rapid growth of corona cases in Aurangabad कोरोनाच्या परिस्थितीत औरंगाबाद या शहरांपुढे गेल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देसाप्ताहिक पाॅझिटिव्हिटी प्रमाणात राज्यात औरंगाबाद पहिल्या क्रमांकावरऔरंगाबाद जिल्हा सक्रिय रुग्णांमध्ये देशात ६ व्या क्रमांकावर आला आहे.

औरंगाबाद : औरंगाबादने कोरोनाच्या साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी प्रमाणात मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांनाही मागे टाकले आहे. साप्ताहिक पाॅझिटिव्हिटीत औरंगाबाद राज्यात पहिल्या क्रमांकावर गेले आहे. रुग्णवाढीच्या दरातही औरंगाबादने या तिन्ही शहरांना मागे टाकले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

औरंगाबाद जिल्हा सक्रिय रुग्णांमध्ये देशात ६ व्या क्रमांकावर आला आहे. देशासह सक्रिय रुग्णांच्या बाबतीत औरंगाबाद राज्यातही ६ व्या क्रमांकावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन वर्ष लोटले आहे. पण वर्षपूर्तीनंतर त्याचे आव्हान आणखी वेगाने वाढले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रोज एक ते दीड हजारांवर रुग्णांची भर पडत असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ७२ हजारांवर गेली आहे. औरंगाबाद शहराची मुंबई, पुणे, नागपूर या शहरांशी कायम तुलना केली जात आहे. औरंगाबादने या शहरांना मागे टाकले आहे. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीत औरंगाबाद या शहरांपुढे गेल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. याशिवाय काही बाबी राज्याच्या सरासरीपेक्षा औरंगाबादेत अधिक असल्याचे वास्तव समोर आले आहे. ब्राझीलमधील व्हेरियंटही महाराष्ट्रात आढळला आहे. त्यामुळे औरंगाबादकरांनी अधिक सावध होण्याची गरज आहे.

रुग्णवाढीचा दर - साप्ताहिक सरासरीऔरंगाबाद - २.४१ टक्केनागपूर - १.८७ टक्केपुणे - १.११ टक्केमुंबई - ०.८७ टक्केराज्याची सरासरी - १.०९ टक्के

चाचण्या प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे : औरंगाबाद - १ लाख २६ हजार २६३राज्याची सरासरी - १ लाख ४१ हजार ८५६

साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी : औरंगाबाद - ४८.२० टक्केजालना - ३८.०९ टक्केपुणे - ३३.७२ टक्केनागपूर - ३२.२० टक्केनाशिक - ३१.७३ टक्केमुंबई - १५.१९ टक्केराज्याची सरासरी - २१.५२ टक्के

सक्रिय रुग्णांपैकी गृह अलगीकरणातील रुग्ण :औरंगाबाद - ६३.२० टक्केराज्याची सरासरी - ५८.५० टक्के

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद