शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

औरंगाबादच्या विमानसेवेचे ऑक्टोबरमध्ये ‘टेकऑफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 17:07 IST

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पूर्वीप्रमाणेच सुरु होणार उड्डाणे

ठळक मुद्देइंडिगोची दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूसाठी एअरबस

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून २५ आॅक्टोबरपासून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी पूर्वीप्रमाणे एअरबस उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले आहे, तसेच उदयपूर आणि अहमदाबादसाठीही नवी सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्चपासून विमानसेवा बंद होती. तीन महिन्यांनी १९ जूनपासून  इंडिगोने दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली या मार्गावर उड्डाण सुरू केले.  त्यानंतर १५ जुलैपासून इंडिगोने हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू केली आहे. एअर इंडियानेही आता दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली सेवा सुरू केली आहे. हिवाळी शेड्यूलमध्ये इंडिगोने आता २५ आॅक्टोबरपासून मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादसाठी १८० आसन क्षमतेच्या, तर उदयपूर आणि अहमदाबादसाठीही छोट्या विमानाद्वारे (एटीआर) नवी सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी यास दुजोरा दिला. पर्यटनाच्या राजधानीतून २१ वर्षांनंतर उदयपूरसाठी १६ आॅक्टोबर २०१९ रोजी एअर इंडियाने विमानसेवा सुरू केली  होती. ही सेवा सध्या बंद आहे; परंतु आॅक्टोबरपासून या मार्गासह एअर इंडियाची मुंबई-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवाही सुरू होणार आहे. 

विमानसेवा  होईल पूर्ववत२०१९ मध्ये हिवाळ्यात ज्याप्रमाणे विमानसेवा सुरू होत्या, त्याचप्रमाणे विमानसेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. कोरोनामुळे काही अडथळा आला नाही तर नियोजनाप्रमाणे औरंगाबादची विमानसेवा पूर्ववत होईल.- सुनीत कोठारी, उद्योजक 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकtourismपर्यटन