शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये कचऱ्यावर प्रक्रियेसाठी एजन्सी ठरली; दराबाबत मनपाच्या वाटाघाटी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 19:00 IST

मागील दोन महिन्यांपासून मनपा प्रशासन निविदाच उघडण्यास तयार नव्हते. चार दिवसांपूर्वी निविदा उघडण्यात आल्या.

ठळक मुद्देस्पर्धेत नागपूर येथील वेस्ट बीन सोल्युशन कंपनीने बाजी मारली. मनपा प्रशासन कंपनीसोबत दरांची वाटाघाटी करीत आहे. 

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी निविदा मागविल्या होत्या. शहरातील नऊ झोनमध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी म्हणून विकेंद्रीकरण पद्धतीची निविदा प्रसिद्ध केली होती. मागील दोन महिन्यांपासून मनपा प्रशासन निविदाच उघडण्यास तयार नव्हते. चार दिवसांपूर्वी निविदा उघडण्यात आल्या. स्पर्धेत नागपूर येथील वेस्ट बीन सोल्युशन कंपनीने बाजी मारली. मनपा प्रशासन कंपनीसोबत दरांची वाटाघाटी करीत आहे. 

सहा महिन्यांपूर्वी मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा डीपीआर तयार केला. या डीपीआरमध्ये महापालिकेच्या नऊ झोनमध्ये छोट्या-छोट्या मशीन लावून कचऱ्यावर प्रक्रिया करावी, असे नमूद केले. राज्य शासनानेही या डीपीआरला मंजुरी दिली. विकेंद्रीकरण पद्धतीची निविदा काढावी किंवा नाही, या संभ्रमात प्रशासन सापडले होते. कचराकोंडीच्या प्रचंड दबावानंतर आणि न्यायालयालाही आम्ही काही करतोय हे दाखविण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली. पहिल्यांदा एकाच कंपनीने निविदा भरली. दुसऱ्यांदाही तीच अवस्था झाली. तिसऱ्या वेळेस दोन कंपन्यांच्या निविदा आल्या.

मागील दोन महिन्यांपासून मनपा प्रशासन निविदा उघडण्यास तयार नव्हते. अखेर चार दिवसांपूर्वी निविदा उघडण्यास मुहूर्त सापडला. नागपूर येथील वेस्ट बीन सोल्युशन कंपनीने बाजी मारली.  निविदा प्रक्रियेनुसार कंपनी नऊ झोनमध्ये मशीन उभी करण्यास तयार आहे. मनपा प्रशासनाचे म्हणणे आहेकी फक्त ३ मशीन तूर्त उभ्या कराव्यात. दररोज एका मशीनवर १६ टन प्रक्रिया करावी. एका टनासाठी मनपा किती पैसे देणार हे अद्याप ठरलेले नाही. दरासाठी वाटाघाटी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रयोग : ...तर इतर ठिकाणी मशीनतीन मशीनवर कचऱ्यापासून यशस्वीपणे खतनिर्मिती सुरू झाल्यास प्रत्येक झोनमध्ये मशीन लावण्यात येईल. निविदेच्या अटी, शर्तीमध्ये कंपनीने बेलिंग, श्रेडिंग मशीनही लावाव्यात असे  म्हटले आहे. कंपनीने एका झोनमध्ये तीन मशीन लावण्याची तयारी दर्शविल्याचे कळते. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद