शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादमध्ये वीजपुरवठ्याचे पुन्हा खाजगीकरण ? चार दिवसांपूर्वी खाजगी कंपनीकडून झाली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 13:23 IST

केंद्रात आणि राज्यात सत्तारुढ असलेल्या पक्षाशी जवळीक असलेल्या वीज क्षेत्रातील एका बड्या खाजगी कंपनीने केली पाहणी

ठळक मुद्देया पूर्वी फ्रँचायझीकरणाचा प्रयोग फसलेला आहे.खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी 

औरंगाबाद : यापूर्वी शहरात विद्युत पुरवठ्यासाठी फ्रँचायझीकरणाचा प्रयोग फसलेला आहे.  फसलेल्या या प्रयोगाचा मोह महावितरणला अनावर झाला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तारुढ असलेल्या पक्षाशी जवळीक असलेल्या वीज क्षेत्रातील एका बड्या खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वीच शहरात येऊन चाचपणी केल्याचे अधिकृत वृत्त आहे. 

प्रामुख्याने ज्या शहरात विजेची चोरी आणि गळतीचे प्रमाण अधिक आहे. त्याठिकाणी थकबाकी कमी होण्याऐवजी दरमहा त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची वाढ होत आहे, अशा शहरांमध्ये वीजपुरवठ्यासाठी फ्रँचायझीकरणाचा विचार पुन्हा ऐरणीवर येत आहे. नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत औरंगाबाद शहराची थकबाकी १३१ कोटी ८५ लाख रुपये एवढी असून, वसुलीबाबत महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे, हे विशेष. ठाणे जिल्ह्यातील शिव, मुंब्रा, कळवा व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे विद्युत पुरवठा करण्यासाठी नुकत्याच खाजगी कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता औरंगाबाद शहरही फ्रँचायझीकरणासाठी ऊर्जा विभागाच्या रडारवर आहे. 

तथापि, खाजगी कंपनीचे अधिकारी शहरात येऊन गेल्याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले. शहरात कोणी येऊन गेले असेल, त्याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. आम्हाला फ्रँचायझीकरणासंबंधी कोणी भेटलेलेही नाही, असे सांगत मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला. 

दरम्यान, चार दिवसांपूर्वी वीज क्षेत्रात कार्यरत एका कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादेत आले. त्यांनी मिलकॉर्नर येथील पॉवरहाऊस येथे जाऊन शहरातील वीजपुरवठ्याबद्दल माहिती जाणून घेतली. त्यानंतर हे अधिकारी परिमंडळ कार्यालयातही येऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. फ्रँचायझीकरणाचा अपयशी ठरलेला हा प्रयोग पुन्हा एकदा करून पाहण्याचे कारण काय, अशी कुजबुज महावितरणमध्ये सुरू झाली असून, तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी याविरुद्ध आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जीटीएल’ने आधी दाखविला आहे ठेंगाजीटीएल या फ्रँचायझी कंपनीने ३० एप्रिल २०११ रोजी औरंगाबाद शहराच्या विद्युत पुरवठ्याचा ताबा घेतला. जीटीएलने यासंबंधीची कसलीही पूर्वकल्पना न देता रातोरात सर्व उपकेंद्रांचा ताबा घेत महावितरण कंपनीच्या कर्मचारी-अभियंत्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतर २०१४ मध्ये तब्बल २५० ते ३०० कोटी रुपयांचे महावितरणचे देणे बुडवून जीटीएलने येथून गाशा गुंडाळला. मागील चार वर्षांपासून यासंदर्भात महावितरणच्या मुंबई मुख्यालयातील फ्रँ चायझी सेलमध्ये जीटीएलसोबत चर्चेच्या फेऱ्या रंगत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादelectricityवीज