शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये वर्षभरात ४ हजार जणांना कुत्र्याचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 20:29 IST

शहरात गेल्या वर्षभरापासून मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याच्या घटना होत आहेत.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये ५० टक्के बालकांचा समावेशमोकाट कुत्र्यांचे बालकांवर हल्ले सुरूच

औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांकडून बालकांवर हल्ले सुरूच आहेत. पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारीदेखील कुत्रा चावल्यामुळे तीन बालकांवर घाटी रु ग्णालयात उपचार करण्यात आले. मोकाट कुत्र्यांनी वर्षभरात चार हजार जणांना चावा घेतला. यामध्ये ५० टक्क्यांवर बालकांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहरात गेल्या वर्षभरापासून मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याच्या घटना होत आहेत. विशेषत: मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ला होण्याचे प्रकार अधिक आहेत. सहा ते आठ कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याची घटना शनिवारी दुपारी सूतगिरणी परिसरातील मैदानावर घडली. यावेळी नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने बालिका बचावली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी सिडको, एन-२ येथील ११ वर्षीय, आसेफिया कॉलनीत ५ वर्षीय, तर जयसिंगपुरा येथील ८ वर्षीय बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. यामध्ये एका बालकाला कुत्र्याच्या लहान पिल्लाने चावा घेतल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार करण्यात आले. याशिवाय ६ मोठ्या व्यक्तींनीही कुत्रा चावल्यामुळे रविवारी घाटीत धाव घेतली. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार करण्यात आले.

शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्याकडे मनपाचे लक्ष जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील रस्तोरस्ती, चौकाचौकात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात. दिवसा आणि रात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांवर, दुचाकीचालकांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ला केला जात आहे. वारंवार मागणी करूनही कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

कुत्र्यांच्या रूपाने बालकांवर संकटमोकाट कुत्र्यांच्या रूपाने शहरातील बालकांवर संकट निर्माण झाले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या जखमेत रेबीजचे विषाणू असतात. रेबीजच्या विषाणूंना तातडीने नियंत्रणात न आणल्यास ते मेंदूपर्यंत जातात आणि रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णांना तातडीने अ‍ॅन्टी रेबीज सिरम (एआरएस) देणे आवश्यक असते. त्यानंतर रुग्णांना अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) दिली जाते. घाटी रुग्णालयात तब्बल वर्षभरापासून ‘एआरव्ही’ उपलब्ध नाही. लसीसाठीही थेट मेडिकलचा, मनपाचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची परवड होत आहे. घाटीने मनपाकडे रेबीस लसींची मागणी केली आहे.

मनपाकडे लसींची मागणीघाटीत गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या चार हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये ५० टक्क्यांवर बालकांचा समावेश होता. रविवारी आठ जण दाखल झाले. यात दोन बालकांचा समावेश होता. महापालिकेकडे रेबीज लसीची मागणी करण्यात आली आहे.- डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdogकुत्राgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी