शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : १ हजार १०० पैकी १४७ कर्मचारी घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:21 IST

महापालिकेत कर्मचारी नसल्याचे कारण दाखवत मागील दोन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून तब्बल १,१०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली.

ठळक मुद्देआऊटसोर्सिंगवर हल्लाबोल : मनपा आयुक्तांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत कर्मचारी नसल्याचे कारण दाखवत मागील दोन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून तब्बल १,१०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. त्यातील अतिरिक्त ठरणारे कर्मचारी विभागनिहाय निवडावेत, असा आदेश चार दिवसांपूर्वीच आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिला होता. सर्व विभागप्रमुखांनी शुक्रवारी यादी सादर केल्यानंतर १४७ कर्मचाºयांना घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ही कारवाई होती. यापुढे कंत्राटदाराला मुदतवाढ न देता थेट मनपाच्या आस्थापनेवरच कर्मचारी भरती करण्याचाही निर्णय आयुक्तांनी घेतला.मागील १५ वर्षांमध्ये महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त झाले. निवृत्त कर्मचाºयांचा जागाच प्रशासनाने भरल्या नाहीत. मंजूर पदांवर भरती करण्याचे दरवेळी टाळण्यात आले. दोन वर्षांपूर्वी कामांसाठी कर्मचारीच नसल्याची ओरड विभागनिहाय सुरू झाली. त्यामुळे प्रशासनाने आऊटसोर्सिंगचा निर्णय घेतला. बचत गट, खाजगी कंत्राटदार आदींच्या माध्यमातून तब्बल १,१०० कर्मचारी भरती करण्यात आले. जेव्हा ही भरती सुरू झाली तेव्हा सर्वांत आघाडीवर राजकीय मंडळी पुढे होती. नगरसेवक, पदाधिकाºयांनी मोठ्या प्रमाणात आपल्या नातेवाईकांना या खाजगी भरतीत घुसडले. राजकीय वरदहस्त असल्याने हे कर्मचारी निव्वळ हजेरी लावण्याचे काम करीत आहेत. १,१०० कर्मचाºयांच्या पगारापोटी महापालिकेला दरमहा १ कोटी ६५ लाख रुपये अदा करावे लागत आहेत. एवढे पैसे खर्च करूनही पाहिजे तसे काम होत नसल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या लक्षात आले. त्यांनी चार दिवसांपूर्वीच सर्व विभागप्रमुखांना बोलावून आऊटसोर्सिंगचे अतिरिक्त कर्मचारी किती अशी विचारणा केली. २४ तासांत अतिरिक्त कर्मचाºयांचीयादी द्या, असेही त्यांनी आदेशित केली.मागील दोन दिवसांत विभागप्रमुखांनी परिश्रम करून १४७ कर्मचाºयांची यादी आयुक्तांना सादर केली. या सर्व कर्मचाºयांना घरी पाठविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. कर्मचारी पुरविणाºया कंत्राटदाराला यापुढे मुदतवाढ न देण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला. महापालिकेतील रिक्त पदे लवकरच भरण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.आता रिक्षांची चिरफाडघनकचरा विभागाने मागील तीन वर्षांमध्ये कचरा उचलण्यासाठी तब्बल ३५० रिक्षा भाडेतत्त्वावर लावल्या आहेत. एका वॉर्डाला ३ रिक्षा देण्यात आल्या आहेत. एका रिक्षाचे भाडे महिना २९ हजार रुपये आहे.दरमहा कोट्यवधी रुपये मनपाला खर्च करावे लागत आहेत. एवढे करूनही शहरात कचºयाचा प्रश्न जशास तसा आहे. आता आयुक्तांचा दुसरा हल्ला रिक्षांवर राहणार आहे. संबंधित विभागाला तशी सूचनाही देण्यात आली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादEmployeeकर्मचारी