शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टातील लेटलतिफांना आता बसणार चाप; थम सिस्टिमद्वारे हजेरी घेणे सुरू

By साहेबराव हिवराळे | Updated: June 27, 2024 20:04 IST

सिस्टिम टाकतेय कात; पोस्ट कर्मचारी झाले अलर्ट

छत्रपती संभाजीनगर : काॅर्पोरेट क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर अधिक जोर दिला जातो, त्याच कृतीचा अवलंब करून एकेकाळी मरगळ आलेल्या पोस्टाने आता कात टाकलेली दिसत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी सर्वच स्टाफ वेळेवर कार्यालयात यावा, लेटलतिफांना चाप बसण्यासाठी थम सिस्टिम हजेरी पोस्टातही सुरू केली आहे.

‘मी कामानिमित्त बाहेर आहे’, किंवा ‘इतर कामा’चे निमित्त सांगून होणारा विलंब आता टळणार आहे. सतत तीन ‘लेट इन’चा थम असल्यास हजेरीच्या जागेवर सुटी टाकावी लागणार किंवा पगार कटणार या भीतीने कर्मचाऱ्यांचीही नियमित हजेरी वेळेवर लावण्याचा प्रयत्न आहे.

मोबाइल ॲपदेखील कर्मचाऱ्यांकडे दिलेले असल्याने ऑनलाइन लोकेशनही आता कर्मचाऱ्यांचे दिसत आहे. ठराविक ठिकाणचे टपाल लेट होत असेल तर त्याला ‘ट्रॅक’ करणे शक्य होणार आहे. आता मोबाइलसंदेशद्वारे हे कळेल. आधार कार्ड वाटप, ड्रायव्हिंग लायसन्स, आयुर्विमा पॉलिसी तसेच सरकारी कागदपत्र सातत्याने आता टपाल कार्यालयामार्फतच येत आहेत.

उपक्रम जोरात..पोस्टाच्या वतीने सुकन्या समृद्धी तसेच विविध योजना ज्येष्ठांसाठी सुरू केल्या आहेत. त्यांच्या आत्मविश्वासाला पोस्टाने बळ दिलेले आहे. त्यामुळे निवृत्तांच्या ठेवीलादेखील चांगले व्याज दिले जात आहे. आरोग्यासाठी पॉलिसीसह विविध योजनांसाठीही पोस्ट कर्मचारी घरोघरी जाऊन नोंदणी करत आहे. निवृत व ज्येष्ठांच्या पेन्शन पोहोचविण्याचे कामही टपाल कर्मचारी करतात. हे सर्व चालू असताना विनाकारण हजेरी टाळू नका असेही पोस्टल कर्मचारी युनियनचे देवेंद्र परदेशी यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.

कार्पोरेट क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर....पोस्टाने जनतेच्या मनातील आत्मविश्वास जपलेला असून, तो टिकविण्यासाठी कर्मचारी व अधिकारी सर्वजण अतिदक्षतेने आता काम करतात, शक्यतो आता लेटलतिफ नाहीत.-असदउल्ला शेख , सहायक निदेशक क्षेत्रीय डाक कार्यालय

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPost Officeपोस्ट ऑफिस