शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पती-मुलाच्या मृत्यूनंतर घर बळकावण्याचा प्रयत्न; भूमाफियांमुळे वृद्धेने घेतल्या झोपेच्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:19 IST

घरावर नाव लिहिणे, झेंडे लावणे, सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्यासह शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढत होते

औरंगाबाद : पती, मुलाच्या निधनानंतर एकटीच राहणाऱ्या ७६ वर्षांच्या वृद्ध महिलेचे घर बळकाविण्याचा प्रयत्न भूमाफिया करीत आहेत. वृद्धेला धमकावले. २० ऑक्टोबर रोजी घरालाच आग लावली. या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खात आत्महत्येचा प्रयत्न शनिवारी केला. वृद्धेवर घाटी रुग्णालयातील वाॅर्ड नंबर पाचमध्ये उपचार सुरू आहेत.

सुमन रंगनाथराव धोंगडे (ग.नं. २, विश्रांतीनगर, गारखेडा परिसर) असे या महिलेचे नाव आहे. सुमनबाई यांच्या पतीसह मुलाचे निधन झाले आहे. त्या एकट्याच राहतात. त्यांच्या घरावर मागील वर्षभरापासून गुंड प्रवृत्तीच्या सात लोकांचा डोळा आहे. ते घरी येऊन घर खाली करण्यासाठी त्रास देत आहेत. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारही केली. मात्र गुंडांवर कारवाई झाली नसल्यामुळे त्यांचा त्रास अधिकच वाढला. घरावर नाव लिहिणे, झेंडे लावणे, सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्यासह शिवीगाळ करण्यात येत आहे. याविषयी परिसरातील नागरिकांनीही २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सार्वजनिक तक्रार केली होती. त्यानंतरही त्रास कमी झाला नाही. १ ऑक्टोबर रोजी दोन गुंडांनी घरी येऊन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी सकाळी घराला आग लावली. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे अनर्थ टळला. या दररोजच्या छळाला कंटाळून उपचाराच्या झोपेच्या गोळ्या अतिप्रमाणात सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न सुमनबाई यांनी शनिवारी केला. त्यांच्यावर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत हाेते. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे घाटीत हलविण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांकडे मदतीसाठी याचनावृद्ध सुमनबाई यांचे घर जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना २० ऑक्टोबर रोजीच निवेदन देत गुंडांच्या त्रासापासून मुक्तता मिळवून देण्याची मागणी केली. या निवेदनावर ७ गुंडांची नावे व पत्तेही दिले आहेत. या निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्यामुळे आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यात आल्याचा आरोप वृद्धेच्या मुलीने 'लोकमत'शी बोलताना केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद