शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप

By बापू सोळुंके | Updated: November 27, 2023 14:52 IST

'मराठा समाजाने २४ डिसेंबरपर्यंत संयम बाळगावा, शांततेत लढा चालू ठेवावा,.' 

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी जुनाट नेत्यांचे(मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता) मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे स्वप्न असल्याचा आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. जुनाट नेत्याचे स्वप्न पूर्ण होऊ न देण्यासाठी मराठा समाजाने २४ डिसेंबरपर्यंत संयम बाळगावा, शांततेत लढा चालू ठेवावा, असे आवाहन त्यांनी  केले. 

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे नाव  न घेता जुनाट नेते असे उल्लेख करीत जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना ओबीसी एल्गार सभामधून ते आमचे हातपाय तोडण्याची भाषा करीत आहेत, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणारी भाषण करीत आहेत, सरकारने त्यांना आवरत का नाही, त्यांच्यावर गुन्हा का नोंदवित नाही,असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

जुनाट नेत्याने स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छगन भूजबळ यांना पुण्यात घेराव घातल्याकडे जरांगे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या घटनेला भुजबळच जबाबदार आहे, त्यांची भाषा मराठा समाजाबद्दल वेगळी आहे. ओबीसी नेत्यांना तेढ निर्माण करायचे आहे,  त्यांची इच्छा मराठा समाजाने पूर्ण होऊ देऊ नये, आपल्याला २४ डिसेंबर रोजी आरक्षण मिळणारच आहे. समाजाने शांत राहावं,असे आपले समाजाचे लेकरू म्हणून कळकळीचे आवाहन असल्याचे जरांगे म्हणाले.  १ डिसेंबरपासून चौथ्या टप्प्यातील दौराचौथा टप्प्यातील आपला दौरा १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. १ रोजी जालना येथे सभा होईल. २ डिसेंबर रोजी कोलते पिंपळगाव(ता.भोकरदन) येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांस अभिवादन करून चौथ्या टप्प्यातील अधिकृत दौरा सुरू होईल. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समाज बांधवांचा आशिर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जाणार आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण