शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्नावर राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:58 IST

मराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणजे औरंगाबाद होय. शहर मागील एक दशकापासून तहानलेले आहे. शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही. कोणाला दोन, तर कोणाला सहा दिवसाआड पाणी मिळते. शहराची तहान भागावी म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने नऊ वर्षांपूर्वी महापालिकेला समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी १९४ कोटींचा निधी दिला. या निधीवरील व्याजच ११४ कोटी झाले आहे.

मुजीब देवणीकरलोकमत न्यूज नेटवर्कमराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणजे औरंगाबाद होय. शहर मागील एक दशकापासून तहानलेले आहे. शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही. कोणाला दोन, तर कोणाला सहा दिवसाआड पाणी मिळते. शहराची तहान भागावी म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने नऊ वर्षांपूर्वी महापालिकेला समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी १९४ कोटींचा निधी दिला. या निधीवरील व्याजच ११४ कोटी झाले आहे. जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी महापालिकेने औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला ठेका दिला. ८०० कोटी रुपयांच्या या कामात कंपनीने ४०० कोटी रुपये टाकावेत असेही ठरले. २०१५ मध्ये प्रत्यक्ष कामही सुरू झाले. शहरात अजून पाणी आले नसताना कंपनीने दरवर्षी १० टक्के पाणीपट्टीत वाढ सुरू केली, कारण करारात तसे नमूद केले होते. कंपनीची सावकारी शहराला परवडणार नाही, म्हणून महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीच्या शिलेदारांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये कंपनीची हकालपट्टी केली.कंपनीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, अद्याप निकाल आलेला नाही. कंपनीने नुकसानभरपाई मिळावी म्हणून लवादाकडेही धाव घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शहरातील पाणी प्रश्नात लक्ष घातले. त्यांनी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबत मुंबईत एक बैठकही घेतली. बैठकीला औरंगाबाद शहरातील सर्व राजकीय पक्षांचे आमदारही उपस्थित होते. कंपनीने नागरिकांवर टाकलेल्या जाचक अटी, ज्यात दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टीवाढ रद्द करण्याच्या सूचना केल्या. कंपनीने त्या मान्य केल्या. नव्याने करार करून शहराला पाणी मिळेल या दृष्टीने पाऊल उचलावे, असा सल्लाही त्यांनी दिला. कंपनीचे अधिकारी सोमवारी औरंगाबादेत दाखल झाले. महापालिकेतील सेना पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याचवेळी भाजपच्या नगरसेवकांनी सिडको-हडको भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या कारणावरून गोंधळ घातला. त्यामुळे कंपनीसोबत नियोजित बैठक होऊ शकली नाही.एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस शहरातील पाणी प्रश्न सुटावा म्हणून सकारात्मक पाऊल टाकत आहेत. दुसरीकडे स्थानिक भाजप नगरसेवक फक्त सेनेला डिवचण्यासाठी समांतरच्या बैठकांवर पाणी फेरण्याचे काम करीत आहेत. हा विरोधाभास औरंगाबादकरांच्या पचणी पडायला तयार नाही. मागील दहा वर्षांपासून पाणी प्रश्न सोडविण्यात पदाधिकाºयांना यश आलेले नाही. शहरात पाणी येतअसताना त्यात खोडा घालण्याचे काम स्थानिक मंडळी करीत आहेत. पाणी प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे हे प्रयत्न आहेत.प्रत्येक निवडणुकांमध्ये सेना-भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडविणार, असे आश्वासन दिलेले असते. शहरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर वळणार येऊन ठेपलेला असताना प्रा. विजय दिवाण यांच्या नेतृत्वाखालील समांतर जलवाहिनी कृती समितीनेही सोमवारी कंबर कसली. पुन्हा या शहरात समांतर जलवाहिनीची कंपनी येऊच देणार नाही, यासाठी लोकलढा उभारण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. येणाºया काही दिवसांमध्ये समांतर जलवाहिनीचा प्रवास सोपा नाही.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका