शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मजुराच्या ७ वर्षीय चिमुकलीचे अपहरणकरून अतिप्रसंगाचा प्रयत्न; दोघे आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:11 IST

चिमुकलीवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत.

वाळूज महानगर  : बांधकाम मजूर असलेल्या आजी, वडील आणि मामांसोबत शेडमध्ये झोपलेल्या एका 7 वर्षीय चिमकलीचे अपहरण करून तिच्यावर दोघांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री वडगाव कोल्हाटी येथे घडली. दरम्यान, चिमुकलीवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत. तर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

या विषयी अधिक माहिती अशी की, वडगाव (को.) साजापूर रस्त्यावर एका तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर काम करणारे मजूर तेथेच बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. गुरुवारी रात्री पीडित चिमुकली आजी, वडील व दोन मामांसोबत शेडमध्ये झोपली होती. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास दोन अज्ञान आरोपींनी चिमुकलीचे अपहरण केले.  घरापासून तिला 100 मीटर अंतरावर नेऊन आरोपींनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या चिमुकलीने आरडाओरडा केला. यामुळे आरोपी तिला येथेच टाकून पळून गेले. यानंतर घाबरलेली चिमुकली घराच्याविरुद्ध दिशेने पळत जात एका ठिकाणी लपून बसली. दरम्यान, आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिक तेथे जमा झाले. त्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. 

चिमुकलीवर उपचार सुरुपीडित चिमुकलीवर आरोपींनी अत्याचाराचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांनी तिच्या ओठाचा चावा घेतला आहे. सध्या चिमुकलीस उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरु आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करत आहेत. चिमुकलीचे अपहरण करण्यापूर्वी आरोपींनी इमारतीवर झोपलेल्या एका मिस्त्रीचा मोबाईल चोरला असल्याची माहिती पुढे आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद