शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन खाजगी बसवर दगडफेक करुन लुटीचा प्रयत्न; जिकठाण फाट्यावरील थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 13:21 IST

पोलिसांनी दोघांना पाठलाग करुन ताब्यात घेतले 

- मेहमूद शेखवाळूज महानगर : दोन खाजगी ट्रॅव्हल बसेसवर दगडफेक करुन प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न फसल्याची घटना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास नगररोडवरील जिकठाण फाट्याजवळ घडली. बसेसवर दगडफेक करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले असून त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्रे जप्त करण्यात आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

पुणे येथुन शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संजय ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक एम.एच.३८, एफ.२०९९) चालक संतोष रंगलाल जाधव (रा.धुमका,ता.जि.वाशिम) व वाहक यशवंत दिनकर करवले (४२, रा.इंदौर) हे  २९ प्रवास्यांसह हिंगोलीला जाण्यासाठी निघाले होते. पुणे-नगर महामार्गावरुन हिंगोलीच्या दिशेने जात असतांना नगररोडवरील जिकठाण फाट्याजवळ या बसवर अचानक दगडफेक सुरु झाली. बससमोरील काच फुटल्याने चालक संतोष जाधव याने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्याकडेला उभी केली. याचवेळी पाठीमागून खुराणा ट्रॅव्हलची बस ( क्रमांक एम.एच.४०,सी.एम.४५८८) मुंबईडून जवळपास ३७ प्रवासी भरुन नागपूरच्या दिशेने येत होती. या बसवर देखील दगडफेक करण्यात आल्याने चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. दरम्यान, दोन्ही चालकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी दोन आरोपींना पाठलाग करुन पकडलेमाहिती मिळताच पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल ढोले, उपनिरीक्षक सखाराम ढोले, उपनिरीक्षक भगवान मुजमुले, पोकॉ.विकास जाधव, पोकॉ. श्याम जगताप आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नगररोडवर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध सुरु केले होता. काही अंतरावर पोलिसांना पाहून दोघे पळताना दिसले. त्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. अक्षय भोसले (२१) व आतिश पवार (२२, दोघेही रा.नबाबपुरवाडी, ता.गंगापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून धारदार चाकू, कटर, कात्री, पक्कड व एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद