शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

मृताच्या नावे पीआर कार्ड बनवून फ्लॅट ढापण्याचा प्रयत्न; 'सिटी सर्व्हे'च्या अधिकाऱ्यांची मिलिभगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:40 IST

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पहाडेसह सिटी सर्व्हे कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : सिटी सर्व्हे कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पवन कमलचंद पहाडे याने उस्मानपुऱ्यातील एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट पीआर कार्ड तयार करून फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पहाडेसह सिटी सर्व्हे कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पहाडेला अटक करण्यात आली.

सिद्धार्थ रमेश मिश्रा (रा. ह. मु. मुंबई) यांच्या कुटुंबाचा उस्मानपुऱ्यातील गुरू तेगबहादूर स्कूलजवळील क्वीन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्यांचे मोठे भाऊ अनिरुद्ध यांनी सदर फ्लॅट २०१५ मध्ये विकत घेतला होता. मात्र, सिटी सर्व्हे कार्यालयात त्याची नोंद केली नव्हती. त्यादरम्यान सिद्धार्थ नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झाले. आजारपणामुळे अनिरुद्ध यांचे ३० ऑक्टोबर, २०२२ रोजी निधन झाले तेव्हापासून हा फ्लॅट बंद होता. ऑगस्ट, २०२५ मध्ये अचानक त्यांचा फ्लॅट पहाडे नामक गृहस्थाने विकत घेतला असून तो सोसायटीत पेढे वाटत असल्याचे समजले. हे ऐकून धक्का बसल्याने मिश्रा कुटुंब तातडीने शहरात आले.

कागदपत्रे बनावटमिश्रा कुटुंबाने फ्लॅटची पाहणी केली असता त्यांच्या भावाचे सर्व साहित्य तसेच होते. सिटी सर्व्हे कार्यालयात तपासणी केली. त्यात पहाडेने बनावट खरेदीखत तयार करून ते सादर करत १७ जूनला सिटी सर्व्हे कार्यालयात नोंद केल्याचे उघडकीस आले. २० फेब्रुवारीला नगर भूमापन कार्यालयात स्वत: अर्ज देत, अनिरुद्ध यांची खोटी सही करत त्याने ही प्रक्रिया पार पाडली. मिश्रा कुटुंबाने उस्मानपुऱ्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्याकडे तक्रार केली. कागदपत्रांची खातरजमा करून येरमे यांनी पहाडेला गुन्हा दाखल करून अटक केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी