शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

वाहन पकडल्याने तहसील परिसरात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:33 IST

औंढा नागनाथ : गौणखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाची जप्तीची कारवाई टाळण्यासाठी वाहनमालकाने तहसीलच्या शासकीय निवासस्थान परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : गौणखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाची जप्तीची कारवाई टाळण्यासाठी वाहनमालकाने तहसीलच्या शासकीय निवासस्थान परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. त्या माथेफिरूवर पोलीस कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिले आहेत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या या वाहनमालकाचे नाव नवनाथ बापूराव चकोर (३५, रा.माटेगाव ता.वसमत) असे आहे. त्यांचे वाहन क्र.एम.एच.०४ -ईएल-७५५० हे वाहन महसूल विभागाने २६ मे रोजी पकडले होते. त्यानंतर त्याने ३१ मे रोजी दंडाची रक्कम भरली होती. हे वाहन सोडून देण्याचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालय वसमत यांच्याकडे पाठविला असता सदरील मालकाने नियमाचा भंग केल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याच्या वाहनाचा मूल्य निर्धारण प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविला. त्यांनी वाहनाचे ६ लाख ५ हजार रुपये एवढे मूल्य काढले होते. ही रक्कम वाहन मालकाला भरण्याच्या लेखी सूचना देऊनही त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महसूल विभागाने २१ जून रोजी सदरील जप्त वाहनाचा लिलाव करण्याचा निर्णय घेऊन त्याला लेखी नोटीस दिली होती; परंतु ती घेण्यास नकार दिला असल्याचे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया टाळण्यासाठी नवनाथ चकोर यांनी तहसील परिसर गाठले व शासकीय निवासस्थाने असलेल्या एका लिंबाच्या झाडाला दोरीने बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तलाठी वैजनाथ मुंडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ चकोर यांना तहसीलदार यांच्या कार्यालयात नेले तेथे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी त्याची विचारपूस केली असता, माझ्याकडे एवढी रक्कम भरण्यासाठी नसल्याने हा प्रकार केल्याचे त्याने सांगितला. दरम्यान, तहसीलदार माचेवाड यांनी चकोर याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आदेश पोलिसांना दिल्याने पोलिसांनी चकोर यास ताब्यात घेतले. उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.