शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शिवशंकर कॉलनीत सात वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 20:56 IST

याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी नराधम तरुणाला अटक केली.

औरंगाबाद : खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून सात वर्षीय बालिकेवर तरुणाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास शिवशंकर कॉलनीत घडली. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी नराधम तरुणाला अटक केली.

करण टिल्लू घोडके (२०, रा. शिवशंकर कॉलनी) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, पीडित बालिका शहरातील एका नामांकित शाळेत पहिल्या वर्गात शिकते. शेजारी महिलेने  मंगळवारी सायंकाळी पूजेनिमित्त त्या बालिकेला घरी बोलावले होते. तिच्या वयाच्या अन्य तीन बालिकेसोबत तीही त्या घरी गेली होती. त्या महिलेच्या घरात आरोपी करण भाडेकरू आहे. त्या घरात  सर्वच चिमुकल्या मैत्रिणी बसल्या होत्या. तेव्हा करणने त्यांना त्याच्या खोलीत बोलावले. तिच्यासोबतच्या दोन मुलींना प्रत्येकी शंभर रुपये देऊन त्यांना सुटे पैसे आणण्यासाठी त्याने बाहेर पाठवून दिले. 

त्यानंतर एकट्या चिमुरडीवर त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घाबरून ती रडायला लागली. बाहेर गेलेल्या मुली काही वेळातच परत आल्याने आरोपीने तिला सोडून दिले. ती त्यांच्यासोबत रडतच घरी आली. आईला पाहून तिने हंबरडाच फोडला. आईने तिला जवळ घेऊन विचारले, तेव्हा तिने घडलेला प्रसंग सांगितला. आई मुलीला घेऊन तात्काळ शेजाऱ्याच्या घरी गेली, तेव्हा भाडेकरू करणने हे घाणेरडे कृत्य केल्याचे त्यांना समजले. मात्र तो त्यावेळी घरी नव्हता. मुलगी प्रचंड घाबरल्याने तिच्या आई-बाबांनी रात्री पोलिसांत तक्रार केली नाही. बुधवारी सकाळीच नराधमाला पकडून चोप देऊन त्याच्याविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मीरा लाड या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.