शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांवर नव्हे, अपप्रवृत्तीवर हल्ला, ठाले पाटील यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 08:24 IST

ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली.

ठळक मुद्देठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. या अपप्रवृत्तींवर उदाहरणांसह प्रहार केला आहे. त्यात कोणत्याही राजकीय नेत्यांवर टीका केलेली नाही. ज्यांना मराठी भाषा समजते, त्यांना महामंडळ आणि माझी  भूमिका काय आहे हे ‘अक्षरयात्रा’चे अध्यक्षीय वाचल्यास समजेल, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच अध्यक्षीय मनोगतातील प्रत्येक शब्दावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. 

ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली. नाशिकच्या नियोजित साहित्य संमेलनाविषयीच्या घटना उदाहरणासह उजेडात आणल्या आहेत. यातून संमेलनात सुधारणा व्हावी, हीच अपेक्षा आहे. संमेलन लोकांचे झाले पाहिजे. साहित्यप्रेमींचा पैसा नसेल तर संमेलन निव्वळ राजकीय नेत्यांचे किंवा सरकारचेच होईल. साहित्य महामंडळाला हेच नको आहे. मागील वर्षी  उस्मानाबाद येथे झालेले संमेलन कोणत्याही राजकीय मदतीशिवाय आणि अवघ्या तीन जणांनी मेहनत घेत कमी पैशांत यशस्वी करून दाखविले आहे. हीच अपेक्षा निमंत्रक संस्थेकडे संमेलन देताना व्यक्त केली होती. ती त्यांनाही मान्य होती; मात्र संमेलनाचा स्वागताध्यक्ष निवडण्याचा असलेल्या अधिकाराचा वापर करून निधी संकलनाचे काम स्वागताध्यक्षावर सोपविल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महामंडळाचे कार्यवाह डॉ.दादा गोरे,  कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांची उपस्थिती होती.

चर्चेतून दिशा मिळावीदोन्ही बाजूेची मते मला मान्य आहेत. त्यावर चर्चा व्हावी, दिशा मिळावी. साहित्य संमेलन हे निव्वळ साहित्यासाठी व्हावे, हीच अपेक्षा आहे. महामंडळाचा कार्यकाळ आणखी एक वर्ष असणार आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहून योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडून महामंडळ गेल्यानंतर बोलून, भूमिका घेऊन उपयोग होणार नाही. ती आताच घेतली पाहिजे. त्यानुसार ती घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsahitya akademiसाहित्य अकादमी