शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

चुलतभावाचा साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 20:51 IST

घराशेजारी राहणा-या चुलतभावाने साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जुना मोंढा परिसरातील रेंगटीपुरा घडली.

औरंगाबाद: घराशेजारी राहणा-या चुलतभावाने साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जुना मोंढा परिसरातील रेंगटीपुरा घडली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.याविषयी अधिक माहिती अशी की, आरोपी हा २६ वर्षीय अविवाहित तरूण असून तो वेल्डिंगच्या दुकानात काम करतो. आरोपी आणि पीडितेचे कुटुंब जुना मोंढा परिसरातील रेंगटीपुरा येथे एकाच वाड्यात राहतात. त्याच्या मोठ्या आणि लहान भावाचा विवाह झालेला आहे. २ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पीडिता तिच्या घरात एकटी असताना आरोपीने चिमुकलीला पाळीव प्राणी दाखविण्याच्या अमिष दाखवून गच्चीवर नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडिता रडू लागल्याने त्याने तिला सोडले आणि तो घराबाहेर पडला.घराबाहेर असलेली तिची आई घरी आल्यानंतर चिमुकलीने रडतच ही घटना सांगितली. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी दुस-या दिवशी चिमुकलीला घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी या घटनेची माहिती जिन्सी पोलिसांना कळविली. शिवाय त्यांचा अभिप्रायही कळविला. यानंतर पीडितेच्या मातेने दिलेल्या तक्रारीवरून जिन्सी पोलिसांनी आज रविवारी आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्यास अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्ही.आर. काळे तपास करीत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगAurangabadऔरंगाबाद