शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानफोडीच्या वाढत्या घटनेने व्यापाऱ्यांत चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 19:22 IST

दरवर्षी ४ ते ५ अशा घटना घडत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देदोन महिन्यांत एकच दुकान दुसऱ्यांदा फोडलेतीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोंढा

औरंगाबाद :  एकच दुकान दोन महिन्यांत चोरट्यांनी दुसऱ्यांदा फोडले. यामुळे मोंढ्यात व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दुकानफोडीची ही पहिली घटना नसून दरवर्षी चार ते  पाच दुकाने फोडली जातात. लाखो रुपयांचे समान चोरी होते. विशेष म्हणजे रविवारी सुटीच्या दिवशीच मोंढ्यात दुकानफोडीच्या घटना घडल्या आहेत.

मोंढा रविवारी बंद असतो. २ आॅगस्ट रोजी मध्यरात्री विष्णुकांत दरख यांचे किराणा दुकान फोडून चोरट्यांनी संगणक, डीव्हीआर, सीसीटीव्ही, टीव्ही चोरला. एवढेच नव्हे तर काजू, बदाम हा सुकामेवा सुमारे ५० हजारांचा माल चोरला. दरवर्षी ४ ते ५ अशा घटना घडत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. ३० जुलै २०१९ रोजी येथील होलसेल व्यापारी विनोद लाहोटी यांच्या दुकानातून सुमारे ४ लाख रुपयांचे तुपाचे डबे चोरीला गेले होते. त्याच बाजूचे तीर्थकर या दुकानातही चोरी झाली होती. ते चोर अजूनही पकडले गेले नाहीत. येथील व्यापारी संजय कांकरिया यांच्या जुन्या दुकानातून मागील वर्षी दीड लाख रुपयांचे सामान चोरले होते. मात्र, पोलिसांनी आठ दिवसांत सराईत चोरांना पकडले होते. पूर्वी सागर ट्रेडिंग दुकानात नेहमी चोरी होत असे. अखेर त्या दुकानदाराने आपले दुकान बंद केले, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोंढाविशेष म्हणजे जुना व नवा मोंढा हा परिसर एक, दोन नव्हे तर चक्क तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. क्रांतीचौक पोलीस स्टेशन, सिटीचौक पोलीस स्टेशन व जिन्सी पोलीस स्टेशनचा समावेश होतो. 

लुटमारीच्या घटनातीन वर्षांपूर्वी नव्या मोंढ्यातील श्रीकांत खटोड हे किराणा व्यापारी सकाळी दुकान उघडत असताना त्यांच्या हातातील बँग हिसकावून चोर पळून गेले होते. त्या बँगमध्ये २ लाख रुपये होते. इंदरचंद पगारिया दुकान बंद करून निघाल्यावर त्यांचा पाठलाग चोरट्यांनी घरापर्यंत केला होता.  हातातील बँग हिसकावून नेण्याच्या तीन, चार घटना दरवर्षी मोंढ्यात घडत असतात.  या वाढत्या घटनांमुळे येथील व्यापारी हैराण झाले आहेत. 

नवीन पोलीस चौकी उभारावीमोंढ्यात जुनी पडीत पोलीस चौकी पाडून तेथे नवीन पोलीस चौकी उभारण्यास जनरल किराणा मर्चंट असोसिएशन प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे. पोलिसांनी मोंढ्यात रात्री पेट्रोलिंग वाढवावी, अशी आम्ही मागणी केली आहे. - नीलेश सेठी, अध्यक्ष, जनरल किराणा मर्चंट असोसिएशन

३६० डिग्री फिरणारा सीसीटीव्ही बसवापोलिसांनी मोंढ्यात ३६० डिग्री फिरणारा सीसीटीव्ही बसवावा. त्यास व्यापारी सहकार्य करतील. दरवर्षी ४ ते ५ दुकाने फोडली जातात, व्यपाऱ्यांच्या हातातील पैशाची बॅग पळविणे, लुटमारीच्या घटना घडत असतात. पोलीस चौकी उभारण्यास व्यापारी तयार आहेत. फक्त तेथे २४ तास पोलीस असणे आवश्यक आहे. -संजय कांकरिया, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ 

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी