शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या जन्मात तरी भाजपचा महापौर मुंबईत नाही!' अंबादास दानवेंचा थेट पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:45 IST

भाजपच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसेल, असा दावा केला होता.

छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे आमदार तथा नेते अंबादास दानवे यांनी आज विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर अत्यंत आक्रमक भाष्य केले. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून भाजपने केलेल्या दाव्याला त्यांनी थेट आव्हान देत, "या जन्मात तरी भाजपचा महापौर मुंबईत बसणार नाही," असा घणाघात केला. तसेच, मतचोरी, हापूस आंब्याचा वाद आणि मुख्यमंत्री दौऱ्यातील शिष्टाचार भंगावरही त्यांनी टीकास्त्र सोडले.

'बाजारात तुरी नाही...' मुंबईच्या महापौरांवरून शाब्दिक युद्धभाजपच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसेल, असा दावा केला होता. त्यावर बोलताना अंबादास दानवे यांनी संजय जाधव आणि लोढा यांच्या वक्तव्याला लक्ष्य केले. "बाजारात तुरी नसताना यांचा महापौर...दोघांचाही महापौर बसणार नाही. ठाकरेंच्या विचारांचाच महापौर मुंबईत बसणार. या जन्मात तरी त्यांचा महापौर मुंबईत बसणार नाही," असे थेट आव्हान दानवे यांनी दिले. "मराठी माणूसच महापौर बनेल," असेही त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच भाजपचे नेते लोढा हे सर्व पक्ष चालवतात, या वक्तव्यावर बोलताना दानवे म्हणाले, "लोढा हे बिल्डर आहेत. त्यांना त्यांचे सर्व धंदे लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चापलूसी करावी लागते."

तपोवन वृक्षतोडीवरून भाजपचा 'दुटप्पीपणा' उघडअयोध्या राम मंदिरावरील पताका आणि तपोवनातील वृक्षतोड यावरून दानवे यांनी भाजपच्या धोरणावर तीव्र टीका केली. "राम मंदिरावर जो पताका लावण्यात आला, त्यावर वृक्षाचे चित्र आहे, जो पर्यावरणाचा संदेश देतो. तपोवन हे श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र आहे. असे असताना पताका लावून आठ दिवस झाले आणि त्यांच्याच पक्षातील लोक या तपोवनातील पूर्ण वृक्षांचा नायनाट करण्यासाठी निघाले आहेत," असे म्हणत त्यांनी भाजपचा दुटप्पीपणा यातून स्पष्ट होत असल्याचे सांगितले.

हापूस आंबा: "हापूस आंबा कोकणाचा, रत्नागिरीचा आहे, हे जगाला सांगण्याची गरज नाही. हापूस आंबा महाराष्ट्राची नव्हे, देशाची शान आहे. असे असताना हापूस आंबा आता गुजरातचा, हे नवीन सुरू झाले आहे," असे म्हणत त्यांनी गुजरातच्या दाव्याला खोडून काढले.

पालकमंत्र्यांचा शिष्टाचार भंगमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री गैरहजर असण्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "मुख्यमंत्री आल्यावर पालकमंत्री असलेच पाहिजे, हा शासकीय कार्यक्रम होता. शिष्टाचार हा फक्त पुस्तकात लिहिला आहे, त्याचे पालन होत नाही," असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP won't win Mumbai mayor seat this lifetime: Ambadas Danve

Web Summary : Ambadas Danve refuted BJP's claim on Mumbai's mayoral post, asserting a Shiv Sena leader will hold it. He criticized BJP's double standards on environmental issues, Gujarat's claim on Alphonso mangoes, and protocol breaches during the CM's visit.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपाMunicipal Corporationनगर पालिका