शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सहायक निरीक्षक, फौजदारांना सुटेना पोलीस ठाण्याचा मोह; १७ दिवसांनंतरही निम्मे अधिकारी पूर्वपदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 5:46 PM

बदल्यांचे आदेश होऊन १७ दिवसांचा कालावधी उलटला तरी बदली झालेले निम्म्याहून अधिक पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक अद्यापही पूर्वपदावरच कार्यरत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे ३९ पोलीस उपनिरीक्षक आणि ९ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केल्या आहेत

- बापू सोळुंके । 

औरंगाबाद : बदल्यांचे आदेश होऊन १७ दिवसांचा कालावधी उलटला तरी बदली झालेले निम्म्याहून अधिक पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक अद्यापही पूर्वपदावरच कार्यरत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात ३१ मे रोजी विद्यमान पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त होऊन बदली झालेल्या ठाण्यात १ जूनला रुजू होऊन तसा अहवाल पोलीस आयुक्तालयास सादर करण्याचे नमूद आहे.

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्यात दोनपेक्षा अधिक वर्ष सेवा झालेल्या ३९ पोलीस उपनिरीक्षक आणि ९ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केल्या. याबाबतचे आदेश ३१ मे रोजी पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. या आदेशानुसार बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त होऊन बदली झालेल्या ठाण्यात १ जून रोजी रुजू व्हावे आणि तसा अहवाल लगेच आयुक्त कार्यालयास सादर करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. रविवारी या आदेशाला १७ दिवस पूर्ण झाले. परंतु पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक अद्यापही नव्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. काही ठाणेदारांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, जोपर्यंत नवीन अधिकारी आम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत आमच्या ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांना बदलीच्या ठिकाणी सोडणार नाही. 

आता होईल अंमलबजावणीशहरात मागील महिन्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ईद आल्यामुळे प्रत्येक ठाण्यांतर्गत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक यांना भौगोलिक आणि समाजकंटकांची माहिती असते. ही बाब लक्षात घेऊन ईद  होईपर्यंत बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना लगेच कार्यमुक्त करू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. ईद शांततेत पार पडल्याने आता या बदल्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईल.- डॉ. दीपाली धाटे - घाडगे

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादTransferबदली