शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता धारकांनी मनपाला फसवले; 3 कोटी 24 लाखांचे चेक बाऊन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:33 IST

बंद खात्याचा चेक  महापालिकेला देणे, बँकेत रक्कम नसताना  महापालिकेला चेक लिहून देणे  अशा कारवाया  करणाऱ्या मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी  महापालिका प्रशासनाने वकिलाची नियुक्ती केली आहे

ठळक मुद्देमहानगरपालिकेला फसविणाऱ्या मालमत्ताधारकांवर करणार कायदेशीर कारवाईजप्तीची कारवाई टाळण्यासाठी असंख्य मालमत्ताधारक महापालिकेला धनादेश देतात.

औरंगाबाद : मालमत्ता कर, पाणीपट्टी न भरल्यास महापालिकेकडून संबंधित नागरिकांना कारवाईचा इशारा देण्यात येतो. मालमत्ता जप्तीची कारवाई टाळण्यासाठी असंख्य मालमत्ताधारक महापालिकेला धनादेश देतात.  मात्र हे धनादेश वटत नाहीत. वर्षभराच्या काळात  ३ कोटी २४ लाखांचे ३०३ चेक बाऊन्स झाले आहेत. 

बंद खात्याचा चेक  महापालिकेला देणे, बँकेत रक्कम नसताना  महापालिकेला चेक लिहून देणे  अशा कारवाया  करणाऱ्या मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी  महापालिका प्रशासनाने वकिलाची नियुक्ती केली आहे, अशी माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली. शहरात मालमत्ता कर व पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. कोरोना संसर्गामुळे यंदा वसुलीला चांगलाच फटका बसला. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने प्रशासनाने वसुलीकडे लक्ष दिले आहे. उपायुक्त थेटे यांच्याकडे कर निर्धारक व संकलक म्हणून पदभार देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांनी बैठकांचा धडाका सुरू केला आहे. थेटे यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यात मालमत्ताधारकांनी दिलेले ३०३ धनादेश वटलेले नाहीत. ही रक्कम ३ कोटी २४ लाख रुपये एवढी आहे. नियमानुसार धनादेश वटला नाही तर तीन महिन्याच्या आत कारवाई होणे आवश्‍यक आहे. पण न वटलेल्या धनादेशाचा अहवाल येईपर्यंत मोठा वेळ लागत होता. त्यामुळे ॲड. के. डी. पांडे यांची या प्रकरणी नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे यांच्याकडे अशी प्रकरणे थेट वॉर्ड कार्यालयाकडून जातील. त्यामुळे बँक खात्यावर रक्कम नसताना महापालिकेला धनादेश देणाऱ्यांवर आता कारवाई होईल. भविष्यात अशा प्रकारास आळा बसेल, असे ही त्यांनी सांगितले.

वॉर्ड अधिकाऱ्यांना अधिकार बहाल बेकायदा मोबाईल टॉवरची संख्या शहरात सतत वाढतच चालली आहे. सध्या ११६ अधिकृत तर तब्बल ५८२ बेकायदा मोबाईल टॉवर असल्याचे महापालिकेच्या रेकॉर्डवर आहे. काही आठवड्यांपूर्वी दोन मोबाईल टॉवरचे होत असलेले बांधकाम पालिकेने पाडले होते. त्यामुळे बेकायदा मोबाईल टॉवरवर कारवाई करण्याचे अधिकार आता वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हे अधिकार आधी अतिक्रमण हटाव विभागातील पदनिर्देशित अधिकाऱ्यांनाच होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरfraudधोकेबाजी