शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीसाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इच्छुक उमेदवारांच्या ‘जोर बैठका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 15:59 IST

गुन्हेगारांनी नगरसेवक होण्यासाठी चांगलीच तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीत तिकिटांची मागणी राजकीय पक्षांवर दबाव वाढविणे सुरू

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात शहरातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींनीही भाग घेण्यासाठी जोर बैठका सुरू केल्या आहेत. विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळावी म्हणूनही त्यांनी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. तडीपार, खुनाचा गुन्हा, १४ वर्षे कारागृहात शिक्षा भोगून आलेल्या, दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांनी नगरसेवक होण्यासाठी चांगलीच तयारी सुरू केली आहे. कोणकोणते राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय घटनेनुसार निवडणूक लढविण्याचा सर्वांना अधिकार दिला आहे. कारागृहात राहूनही निवडणूक लढविण्याची मुभा घटनेने दिली आहे. मागील काही वर्षांमध्ये राजकारणाचा कल गुन्हेगारीकडे वाढू लागला आहे. विविध राजकीय पक्षच सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देत आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गंभीर गुन्हे दाखल असलेले काहीजण निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आपल्या सोयीच्या वॉर्डांवर बोट ठेवत राजकीय पक्षांकडे उमेदवारीची मागणीही करीत आहेत.

सेना, भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, एमआयएम आदी पक्षांकडून ही मंडळी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. काहींनी तर वॉर्डांमध्ये अनधिकृत जाहिरात फलक लावून उमेदवारीची घोषणाही करून टाकली आहे. काही वॉर्डांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींनी स्वत: उभे न राहता आपल्या कुटुंबातील व्यक्तीला उभे करणार असल्याचा इशारा दिला आहे. वॉर्डांमधील चौकाचौकात या मंडळींच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. राजकीय पक्षांनीही त्यांना उमेदवारी देणार नाही, असे सांगितलेले नाही. वरिष्ठ निर्णय घेतील म्हणून थोपवून ठेवले आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याची तयारीही त्यांनी ठेवली आहे. 

राजाबाजार दंगलीतील आरोपीराजाबाजार दंगलीत पोलिसांनी दोन्ही समाजाच्या वेगवेगळ्या आरोपींना अटक केली होती. आता हे आरोपी स्वत: किंवा कुटुंबातील कोणाला तरी निवडणूक रिंगणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे आरोपी एमआयएम, सेनेकडे उमेदवारी मागत आहेत.

भाई, भाऊ, दादाकडे सर्वांचे लक्ष लुटमार, तडीपार, दंगल,फसवणुकीसह अन्य  गुन्ह्यांतील आरोपी  ‘भाऊ’, ‘दादा’ यांनी महापालिका निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. ते उमेदवारीसाठी राजकीय पक्षांचे उंबरे झिजवत आहेत. राजकीय पक्ष कुणाला तिकिटे देऊन पावण करणार की ते अपक्षच लढणार, याकडे  लक्ष लागून आहे. 

कारागृहातून बाहेर आल्यानंतर...सेनेचे एक माजी नगरसेवक १४ वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आले आहेत. त्यांनीही सेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता बरीच बदलली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना उमेदवारी मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नाही.

राजकीय पक्ष काय करणार?राजकीय पक्षांनी गुन्हेगार नेत्यांची माहिती प्रकाशित करावी, असे आदेश काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाऊ-दादांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिका वॉर्ड आरक्षण जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक तयारीला लागले आहेत. यात गुंडप्रवृत्तींच्या लोकांचाही सहभाग लक्षणीय आहे. मोठ्या पक्षाच्या तिकिटासाठी आता ही मंडळी राजकीय कार्यक्रमातून दिसू लागली आहे. गतवर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दिलेल्या योगदानामुळे पक्ष नेतृत्वाने अनेकांना महापालिकेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. यामुळे काही अति आत्मविश्वासूंनी चौकाचौकात होर्डिंग उभारणी आरंभली आहे. शहरातून दोनदा तडीपार आणि सुमारे २२ गुन्ह्यांचा शिरावर डोंगर असलेल्या गुन्हेगाराने प्रबळ पक्षाकडून सातारा परिसरात निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली. या गुंडास पक्ष अधिकृत उमेदवारी देणार का, हे काळाच्या उदरात लपलेले गुपित आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात काही वर्षांपूर्वी कारागृहात मुक्कामी राहिलेल्या एकाने मुकुंदवाडी परिसरातून पतंग उडविण्याचे मनात मांडे रचले आहेत.

चारित्र्य प्रमाणपत्रासाठी पोलिसांकडे धावउमेदवारी अर्जात स्वत:विरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती द्यावी लागते. यामुळे स्वयंघोषित उमेदवारांनी पोलीस आयुक्तालय आणि पोलीस ठाण्यांकडे चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर येथेही बाजी मारत दोन महिन्यांपूर्वीच चारित्र्य प्रमाणपत्र पदरी पाडून घेतले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारी