शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीत इच्छुकांचा जल्लोष, छत्रपती संभाजीनगर मनपात ११५ जागांपैकी ५८ महिलांना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:43 IST

सोडत पद्धतीने आरक्षण काढताना इच्छुकांच्या जाेरदार शिट्ट्या, जल्लोष पाहायला मिळाला. ज्यांच्या प्रभागात नको असलेले आरक्षण पडले त्यांचे चेहरे हिरमुसले होते.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील ११५ सदस्य निवडण्यासाठी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन करीत आरक्षण काढण्यात आले. सोडत पद्धतीने आरक्षण काढताना इच्छुकांच्या जाेरदार शिट्ट्या, जल्लोष पाहायला मिळाला. ज्यांच्या प्रभागात नको असलेले आरक्षण पडले त्यांचे चेहरे हिरमुसले होते.

जी. श्रीकांत यांनी अगोदर आरक्षण प्रक्रियेची माहिती दिली. २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या १२ लाख २८ हजार ३२ ही असून, अनुसूचित जातीची २ लाख ३८ हजार १०५ आणि अनु. जमातीची लोकसंख्या १६ हजार ३२० ही ग्राह्य धरून एकूण लोकसंख्या भागिले अनु. जातीची लोकसंख्या गुणीले ११५ जागा याप्रमाणे प्रथम अनुसूचित जातीसाठी २२ जागा उतरत्या क्रमाने आरक्षित करण्यात आल्या.

प्रभाग क्रमांक ६, १०, ११, १२, १३, १४, १६ हे सात प्रभाग वगळून उर्वरीत २२ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली. त्यानंतर २२ चिठ्ठ्या टाकून त्यातून ११ महिलांसाठी राखीव जागा करण्यात आल्या. त्यानंतर एसटी प्रवर्गासाठी प्रभाग १ आणि प्रभाग ४ आरक्षित करण्यात आले. त्यापैकी प्रभाग १ मधील अ ही जागा महिलांसाठी राखीव राहील, असे जाहीर केले.

ओबीसी, सर्वसाधारण आरक्षणओबीसी प्रवर्गासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २७ टक्के आरक्षण गृहीत धरून ३१ जागा राखीव केल्या. आरक्षणासाठी प्रभाग तर २९ आहेत, उर्वरित दोन जागांचे काय? असा प्रश्न होता. त्यासाठीही आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सात प्रभागातून दोन जागा विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आल्या. ३१ जागांमध्ये दोन प्रभागात प्रत्येकी दोन इतर मागासप्रवर्गासाठी जागा आरक्षित झाल्या. त्यातून १६ जागा महिलांसाठी चिठ्ठी काढून आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रत्येक प्रभागात क या ठिकाणी एक जागा निश्चित करून एका प्रभागात दोन जागा राहिल्या.

इच्छुकांच्या प्रश्नावर पिकली खसखसआरक्षणासाठी अ, ब, क, ड अशी नावे दिली. नेमक्या कोणत्या भागाचे आरक्षण निघत आहे, हे काही नवीन उमेदवारांना समजत नव्हते. एका उमेदवाराने प्रशासक यांना प्रश्न केला. प्रशासकांनी प्रभागाविषयी माहिती दिली. जुनी वॉर्ड पद्धत विसरा असे सांगितले. मनपा ही प्रक्रिया समजावून सांगण्यात कमी पडली का? असा प्रश्न इच्छुकाने केला. त्यावर प्रशासकांनी तुम्ही समजून घेण्यात कमी पडले, असा टोला मारताच सभागृहात एकच खसखस पिकली.

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad Municipal Corporation Reservation Draw: Jubilation as 58 Seats Reserved for Women

Web Summary : Aurangabad Municipal Corporation's election reservation draw saw jubilation and disappointment. 58 of 115 seats are reserved for women. The draw followed strict guidelines, allocating seats for SC, ST, OBC, and general categories.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरElectionनिवडणूक 2024