शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

नवपिढीला जीएसटी शिकविणार -अशोककुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:01 IST

एक देश एक कर प्रणाली असलेला वस्तू व सेवा कराची (जीएसटी) महती व कर भरण्याची मानसिकता नवपिढीत तयार करण्यासाठी आता महाविद्यालये व शाळेत जीएसटीची कार्यशाळा घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय जीएसटीचे (सीजीएसटी) संयुक्त आयुक्त अशोककुमार यांनी केली.

ठळक मुद्देजीएसटीच्या पहिल्या वर्षपूर्ती सोहळ्यात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एक देश एक कर प्रणाली असलेला वस्तू व सेवा कराची (जीएसटी) महती व कर भरण्याची मानसिकता नवपिढीत तयार करण्यासाठी आता महाविद्यालये व शाळेत जीएसटीची कार्यशाळा घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय जीएसटीचे (सीजीएसटी) संयुक्त आयुक्त अशोककुमार यांनी केली.देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारी जीएसटी लागू होऊन एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने सिडकोतील सीजीएसटी विभागाच्या इमारतीत विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्य जीएसटी (एसजीएसटी)चे सहआयुक्त प्रशांत नांदेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वांच्या सहकार्याने जीएसटीची अंमलबजावणी यशस्वीरीत्या झाल्याचा उल्लेख करीत अशोककुमार म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासात हे ऐतिहासिक पाऊल होय. जीएसटीची देशात अंमलबजावणी करणे कठीण काम होते. एवढेच नव्हे तर विविध उत्पादने विविध टक्केवारीत समावेश करणे त्याहून कठीण होते; पण जीएसटी कौन्सिलने ते शक्य करून दाखविले. आजघडीला २८ टक्क्यांच्या यादीत अवघ्या ५० उत्पादनांचा समावेश राहिला आहे. जीएसटीची महती व कर का भरावा याची माहिती नवपिढीला देण्यासाठी येत्या काळात महाविद्यालय व शाळांमध्येही जीएसटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शून्य टक्क्यांमध्ये ज्या उत्पादनांचा समावेश आहे त्यांचा एक टक्क्याच्या यादीत समावेश करावा. जास्तीत जास्त १२ टक्के कर आकारणी करावी, अशी सूचना सीएमआयएचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी केली. उद्योजकांच्या सूचनेवरून जीएसटी विभागाने मदत केंद्र सुरूकेल्याबद्दल मसिआचे अध्यक्ष किशोर राठी यांनी सीजीएसटी व एसजीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सरदार हरीसिंग म्हणाले की, जीएसटी लागू होण्याआधी व्यापाºयांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, मागील वर्षभरातील यशस्वी बदल लक्षात घेता आपण विनाकारण भीती बाळगत होतो, असे व्यापाºयांना वाटत आहे. मोठ्या संख्येने नवीन करदाते वाढल्याने व्यापाºयांनी जीएसटीला सकारात्मक स्वीकार केल्याचेही त्यांनी नमूद केले. मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान म्हणाले की, जीएसटीचा व्यापाºयांना किती फायदा झाला हे सांगणे कठीण आहे; पण ई-वे-बिलमुळे मालवाहतूकदारांना मोठा फायदा झाला आहे व टोलनाके नसल्याने पैसा व वेळेची बचत होऊन मालवाहतुकीला गती आल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला.मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी दोन सूचना केल्या. त्यात नवीन करप्रणाली असल्याने वर्षभरात रिटर्न भरताना व्यापाºयांकडून काही चुका झाल्या. त्या सुधारण्यासाठी रिवाईज रिटर्न भरण्याचे आॅप्शन जीएसटीत असावे, एक्साईज व व्हॅटचे ट्रांझिशनल क्रेडिट घेण्याची सुविधा जीएसटीमध्ये पुन्हा देण्यात यावी. या दोन मागण्या जीएसटी कौन्सिलकडे पाठविण्याचे आश्वासन अशोककुमार यांनी दिले.उपायुक्त प्रसन्न दातार यांनी सूत्रसंचालन केले. सीजीएसटी आयुक्त श्रीकांत पाटील, उपायुक्त एस.आर.राजूरकर. एसजीएसटीचे उपायुक्त आनंद पाटील, ताजदार पठाण, सहायक आयुक्त सुजित कक्कड यांच्यासह आयसाचे अध्यक्ष समीर काननखेडकर, मराठवाडा चेंबरचे राकेश सोनी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, विजय जैस्वाल यांच्यासह अन्य व्यापारी, उद्योजक, जीएसटी विभागातील अधिकारी उपस्थित होते.जीएसटीचा प्रमाणपत्र कोर्सएसजीएसटीचे सहआयुक्त प्रशांत नांदेडकर यांनी सांगितले की, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जीएसटीचा प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्यात येणार आहे. अज्ञानामुळे व्यापाºयांमध्ये जीएसटीबद्दल भीती होती ती दूर करण्यात विभाग यशस्वी झाला आहे. विवरणपत्र कसूरदारांसाठी विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबाद