शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाथाचरणी वारकरी रिता जाऊ नये; सेवाभावातून ३३ वर्षांपासून साबुदाणा खिचडीचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 19:25 IST

आज तब्बल १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले

पैठण: आषाढी एकादशीला आलेल्या जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविकांना पैठणच्या संत एकनाथ सेवा संघाच्यावतीने साबुदाणा खिचडीचा प्रसाद आज वितरीत करण्यात आला. विशेष म्हणजे, संघाचे  मोफत खिचडी वाटप करण्याचे यंदाचे ३३ वे वर्ष आहे. आज तब्बल १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आल्याने सुरेश शिंदे यांनी सांगितले. 

पंढरपूरनंतर वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेले एकमेव तिर्थक्षेत्र म्हणून पैठण आहे. वारकऱ्यांची संत एकनाथ महाराजावर मोठी श्रद्धा आहे. पंढरपूर प्रमाणेच दर एकादशीला वारकरी लाखोंच्या संख्येने पैठण येथे हजेरी लावतात. पांडुरंगाचे, नाथांचे भक्त असलेले वारकरी म्हणजे काबाडकष्ट करणारे शेतकरी, तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत ऊन, वारा, तहान भूक याची पर्वा न करता फक्त दर्शनाच्या ओढीने पैठण शहरात हजेरी लावतात. कपाळावर नाथांच्या पादुकेवरील बुक्का लावला की त्यांचे समाधान होते. मग प्रशासनाने काय सुविधा दिल्या, काय दिल्या नाहीत याचा साधा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. असेल तसे निभावून न्यायचे हीच समाधानी वृत्ती वारकरी संप्रदायाची चालत आली आहे. 

नाथांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्ताच्या मुखात प्रसाद रूपी दोन घास पडावे, नाथांच्या मंदीरातून कोणीही उपाशी जावू नये या विचाराने बबनराव उर्फ माऊली मडके, सुरेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना झपाटून टाकले. सन १९९१ ला एकादशीला नाथमंदीरात साबुदाणा खिचडी करून वारकऱ्यांना मोफत वाटपाचा त्यांनी संकल्प केला. यासाठी दानशूर भक्तांची मदत घेण्यात आली. १९९१ ला एकादशीच्या दिवशी ५० किलोचा साबुदाणा आणून त्याची खिचडी प्रसाद म्हणून वाटला. ५० किलो पासून सुरू झालेला खिचडीचा प्रसाद पुढे २५ क्विंटल पर्यंत पोहचला. या उपक्रमाने ३३ वर्षाचा टप्पा ही पार केला. बबनराव उर्फ माऊली यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात गेल्या २५ वर्षापासून सुरेश शिंदे, भाऊसाहेब चव्हाण, केशव भाग्यवंत सातत्याने योगदान देत आहेत. श्रमदानासाठी २५ वर्षाच्या काळात अनेक मान्यवरांनी आपली सेवा या उपक्रमासाठी अर्पित केली आहे. 

खिचडीसाठी भाविक भक्ताकडून दान दिले जाते. साबुदाणा, शेंगदाणे, तूप आदीसह भक्तदान आणून देतात. यातून ३३ वर्षापासून दर एकादशीला  खिचडी तयार करून वाटतो आहे. दान मिळो अगर न मिळो खिचडी वाटपात खंड करण्यात येत नाही, दर महिण्याच्या एकादशीला १० क्विंटल तर आषाढी व कार्तिकी एकादशीला २१ ते २५ क्विंटलपर्यंत साबुदाणा खिचडी तयार करावी लागते, असे माऊली मडके यांनी सांगितले. 

५० हजार भाविकांना वाटप आज जवळपास ५० हजार भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. गुरुवारी अंकुशराव काळे, कल्याण कोकणे, नारायणगाव भजणी मंडळ,  अरूण चव्हाण, सुरेश लिपाणे, भाऊसाहेब चव्हाण,  आदीसह अनेक सेवेकऱ्यांनी प्रसाद वाटप करण्यासाठी श्रमदान केले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAurangabadऔरंगाबाद