शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Ashadhi Ekadashi: जय हरी विठ्ठल! जर्मनीत उभारले ‘विठ्ठलधाम’, निघाली पांडुरंगाची दिंडी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 30, 2023 20:31 IST

आषाढी एकादशीनिमित्त भारताप्रमाणेच जर्मनीची राजधानी बर्लिन येथेही मराठी बांधवांनी पांडुरंगाची दिंडी काढण्यास सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जर्मनी या देशात ‘विठ्ठलधाम’ उभारण्यात आले आहे. होय, येथे भारतातून नोकरी, व्यवसायासाठी गेलेल्या एनआरआयची संख्या मोठी आहे. यामुळे जर्मनीत हिंदू देव-देवतांची मंदिरे उभारली जात आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त भारताप्रमाणेच जर्मनीची राजधानी बर्लिन येथेही मराठी बांधवांनी पांडुरंगाची दिंडी काढण्यास सुरुवात केली आहे. यापुढे जाऊन येथील फुल्डा नावाच्या शहराजवळ ‘किर्शहाईम’ या गावात ‘विठ्ठलधाम’ मंदिर उभारण्यात आले आहे. येथे नुकताच १५ ते १९ जून दरम्यान विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यामुळेच छत्रपती संभाजीनगरातील रहिवासी; पण आता बर्लिन येथे स्थायिक झालेले अमित सोमाणी व अन्य ५० भाविकांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती.

यासोबत बर्लिनमधील मराठी भाषिकांनीही ‘विठ्ठलधाम’ पाहण्यासाठी गर्दी केली होती. चार दिवसीय महोत्सवात ‘किर्शहाईम’ येथे हजारावर भाविकांनी मंदिराला भेट दिली. या ‘विठ्ठलधाम’ परिसरात छोटेसे तळे आहे. त्याचे ‘चंद्रभागा’ असे नामकरण करण्यात आले. जर्मनीतील हे दुसरे मोठे मंदिर आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास भारताचे महावाणिज्यदूत डॉ.अमित तेलंग व त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली. यावेळी भाविकांनी ‘विठ्ठला’चे भजन केले. त्यानंतर ‘जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण’ हरी असा गजरही केला. यावेळी युरोपियन बांधवांनीही या भजनात सहभागी होऊन आनंद लुटला.

कोणी बांधले ‘विठ्ठलधाम’?स्वामी विश्वानंद यांचे शिष्य स्वामी माधव महाराज आणि विठ्ठलधाम आश्रमाच्या संघाने हे विठ्ठलधाम उभारले.

विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणली जयपूरहूनजयपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती बनविण्यात आली. काळ्या पाषाणातील ६ फूट उंचीच्या या मूर्ती आहेत.

प्राणप्रतिष्ठा कोणी केली?अहोबिलम मठातील आचार्य लक्ष्मीनारायण आणि त्यांच्यासोबत मॅारिशस येथील पुजारी देवा कुमार यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

भिंतीवर भगवद्गीतेचे श्लोकविठ्ठलधामच्या भिंतीवर भगवद्गीतेतील श्लोक वाचण्यास मिळतात. संस्कृतमधील श्लोक व त्यांच्या जर्मनी भाषेत केलेल्या भाषांतराच्या फ्रेम येथे आजूबाजूला लावण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAurangabadऔरंगाबादGermanyजर्मनी