शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
4
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
5
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
6
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
7
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
8
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
9
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
10
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
11
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
12
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
13
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
14
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
15
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
16
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
17
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
18
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
19
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर

आरोप सिद्ध न झाल्याने हुंडाबळीच्या गुन्ह्यात सासरच्या चौघांची मुक्तता, खंडपीठातही निकाल कायम

By प्रभुदास पाटोळे | Updated: February 20, 2024 14:55 IST

बीड जिल्ह्यातील प्रकरण; सरकार पक्षाचा पुरावा कमकुवत व तकलादू

छत्रपती संभाजीनगर : आरोप सिद्ध न झाल्यामुळे पतीसह सासरच्या चौघांची हुंडाबळीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करणारा सत्र न्यायालयाचा निकाल औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय एस. वाघवसे यांनी कायम करीत सरकार पक्षाचे अपील फेटाळले.

हुंड्याचे उर्वरित एक हजार रुपये आणि शेती खरेदी करण्यासाठी २० हजार रुपये विवाहितेने माहेरहून आणले नसल्यामुळे शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सासरच्या लोकांवर आरोप होता. रेकॉर्डवरील पुरावा, साक्षीदारांचे जबाब आणि मृत्यूपूर्व जबाबाचे अवलोकन केले असता विवाहितेने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे निष्पन्न होते. आरोपींनी छळ केल्याबाबतचा पुरावा कमकुवत आणि तकलादू असल्याचे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधील बरगवाडी येथील मंदाबाई शिवाजी गुजर हिने १६ जानेवारी १९९८ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. पती शिवाजी, दीर अशोक, सासरा सर्जेराव आणि सासू कांताबाई हे हुंड्याचे उर्वरित एक हजार रुपये आणि शेती खरेदी करण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करीत छळ करीत होते, असा मंदाबाईचा मृत्यूपूर्व जबाब होता. उपचारादरम्यान १९ जानेवारी १९९८ ला मंदाबाईचा मृत्यू झाला. बीडच्या सत्र न्यायालयाने आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला शासनाद्वारे खंडपीठात आव्हान देण्यात आले. आरोपींतर्फे ॲड. राजेंद्र हंगे यांनी काम पाहिले.

एकाच गुन्ह्यासाठी दोनदा खटला चालविणे अयोग्यएखाद्या आरोपीविरुद्ध एकाच गुन्ह्यासाठी दोनदा खटला चालवून त्याला एकापेक्षा जादा वेळा शिक्षा ठोठावणे (डबल जिओपार्डी) कायद्याला अपेक्षित नाही. मात्र, प्रस्तुत प्रकरणातील पती शिवाजीविरुद्ध १९९५ साली भादंवि कलम ४९८-अ नुसार खटला दाखल झाला होता. पती-पत्नीमध्ये तडजोड होऊन पत्नी पुन्हा नांदावयास आली होती, याकडे ॲड. हंगे यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयAurangabadऔरंगाबादBeedबीड