शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने कारवाईचा बडगा उगारताच पक्षभेद विसरून संस्थाचालकांची एकजूट

By राम शिनगारे | Updated: June 3, 2025 20:01 IST

विद्यापीठ प्रशासनाने गुणवत्तेला प्राधान्य देताच धाबे दणाणले

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांच्या ‘नॅक’ मूल्यांकनासह परीक्षामधील होणारी गडबड बंद करण्यासाठी धडक कारवाई केली. त्यामुळे खडबडून जागे झालेले शिक्षण संस्थाचालक पक्षभेद विसरून एकवटले आहेत. मागील १५ दिवसांमध्ये दोन बैठका घेऊन ‘नॅक’ मूल्यांकनात अधिक वेळेची सूट, प्राध्यापकांच्या कंत्राटी नियुक्त्या, अभ्यासक्रमाचे शुल्कवाढ करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढवणार असल्याची माहिती आहे.

विद्यापीठाने कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी ‘नॅक’ मूल्यांकन न केल्यास महाविद्यालयांची प्रवेश क्षमता शून्य करण्याच्या ठरावाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती. त्यात २३३ महाविद्यालयाची प्रवेश क्षमता शून्य करण्यात आली. याविषयी संस्थाचालकांनी ‘नॅक’चे संकेतस्थळ बंद असल्यामुळे मूल्यांकन करता आले नसल्याचे शासनाला कळविले. त्यानुसार शासनाने मूल्यांकनास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. याची अंमलबजावणी करताना विद्यापीठाने ५०० रुपयांच्या मुद्रांकावर ‘नॅक’ करण्याची हमी देऊन प्रवेश क्षमता पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय कुलगुरू डॉ. फुलारी यांनी दिग्गजांच्या महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांना भेटी देत कॉपीवर कारवाई केली. त्याचा फटकाही संस्थाचालकांना बसणार आहे. तसेच विद्यापीठ लवकरच महाविद्यालयांचे शैक्षणिक अंकेक्षण करणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय संस्थाचालकांच्या दोन बैठका पार पडल्या. त्यातील एक बैठक रविवारी देवगिरी महाविद्यालयात झाली. त्यावेळी आ. सतीश चव्हाण, बसवराज मंगरुळे, द्वारकादास पाथ्रीकर, डॉ. शिवाजी मदन, सूर्यकांता गाडे, बाबूराव कदम, मिलिंद शेळके, डॉ. भगवानसिंग डोभाळ, प्रा. सुनील मगरे, गोविंद देशमुख आदी संस्थाचालकांची उपस्थिती होती.

बैठकीतील मुख्य विषय-‘नॅक’ मूल्यांकन सहा महिन्यांत होऊ शकत नाही. त्यामुळे मुदतवाढ हवी.-पात्रताधारक प्राध्यापक मिळत नसल्यामुळे ११ महिन्यांसाठी प्राध्यापक नेमण्याची मुभा.- महाविद्यालयांच्या संलग्नता शुल्कावर आकारण्यात येणारा जीएसटी बंद करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटणार.- विद्यापीठ प्रशासनाने अनेक अभ्यासक्रमांचे शुल्क अपेक्षेएवढे वाढवले नाही. काहींमध्ये तर कमी केले. त्यात शुल्कवाढ करावी.

संस्थांच्याही अनेक अडचणीसंस्थाचालकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी संस्थाचालक एकत्र आले. त्यात अनेक विषय चर्चेत हाेते. विद्यापीठाने काही सुरू केले, म्हणून संस्थाचालक एकत्र आले असे अजिबात नाही. गुणवत्तेलाच आमचे प्राधान्य आहे. मात्र, संस्थांच्याही अनेक अडचणी आहेत. त्या सुटाव्यात.-बसवराज मंगरुळे, व्यवस्थापन परिषद सदस्य, संस्थाचालक गट, विद्यापीठ

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र