शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये जागा नाही म्हणताच प्रवाशाची महिला वाहकास शिवागाळ, शर्ट पकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 19:10 IST

बस जाळून टाकण्याची धमकी देत प्रवाशी बसस्थानकातून निघून गेला

- अनिलकुमार मेहेत्रेपाचोड ( छत्रपती संभाजीनगर): पाचोड बसस्थानकावर आलेल्या आंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर बसमध्ये न घेतल्याने संतापलेल्या प्रवाशाने महिला वाहकाला मारहाण केल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिला वाहकाच्या फिर्यादीवरून पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला वाहक सविता आदिनाथ तोंडे ( ३४)  यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पाचोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  आंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर बस ( एमएच २० बीएल २८०४) आज सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास पाचोडबस स्थानकात आली. चहापाणी घेतल्यानंतर ही बस सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पाचोड बस स्थानकामधून निघाली. याचवेळी एक प्रवासी बसमध्ये चढला. त्यास महिला वाहक तोंडे यांनी गाडीत बसण्यासाठी जागा नाही खाली उतरा, असे सांगितले. मात्र, या प्रवाशाने शिवीगाळ करत महिला वाहक तोंडे यांना शर्टच्या कॉलरला पकडून खाली ओढत मारहाण केली. तसेच त्या प्रवाशाने बस पेटवून देईल अशी धमकी देत तेथून निघून गेला. फेरीवाल्यांनी त्याचे नाव अमोल डुकळे ( रा.पाचोड) असे सांगितले. 

दरम्यान, महिला वाहक तोंडे यांनी पाचोड बसस्थानकमधील वाहतूक नियंत्रक पठाडे यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर पठाडे यांनी महिला वाहक तोंडे व चालकास घेऊन थेट पाचोड पोलीस स्टेशन गाठले. सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या आदेशाने घटनेचा पंचनामा करण्यात आला. तसेच महिला वाहक सविता तोंडे यांच्या फिर्यादीवरून अमोल डुकळे याच्या विरोधात नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीstate transportएसटी