शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉल उत्पादनावर बंदी आणताच साखरेचा गोडवा वाढला

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 11, 2023 15:12 IST

केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंदी आणल्याने साखर उद्योगच नव्हे तर व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला.

छत्रपती संभाजीनगर : देशात यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे तुटवडा जाणवून साखरेचे भाव क्विंटलमागे तब्बल ४१२० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. मात्र, केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी आणली तसेच निर्यातीवरही बंदी आणल्याने त्याचा त्वरित परिणाम, स्थानिक बाजारपेठेवर दिसून आला. १०० रुपयांनी भाव कमी होऊन शनिवारी ४००० रुपये प्रतिक्विंटलने साखर विकली गेली. किलोमागे १ रुपयाने साखर स्वस्त झाल्याने गोडवा वाढला आहे.

उसाच्या कमतरतेमुळे जानेवारी महिन्यात साखर कारखाने बंद होतील व क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची तेजी येईल, असे अनेक साखर उद्योग व व्यापाऱ्यांना अंदाज होता. यामुळे साखरेचा बाजारात मोठा साठा करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंदी आणल्याने साखर उद्योगच नव्हे तर व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. साखरेचे भाव वाढत ३९५० ते ४१२० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले. साखर कारखाने व डिस्टिलरी साखरेच्या रसापासून इथेनॉल तयार करीत होत्या. केंद्र सरकारने या उत्पादनावरच बंदी आणली. यामुळे शनिवारी साखरेचे भाव कमी होऊन ३८५० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आले. तर किरकोळ विक्रीत साखर १ रुपयाने कमी हे दर ४० ते ४१ रुपये प्रतिकिलो असे आहे.

निवडणुकीत महागाईचा मुद्दा नको२०२४ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणुकीत महागाईचा मुद्दा अडसर ठरू शकतो. यामुळे केंद्र सरकारने साखरेच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी इथेनॉल उत्पादनावर बंदी आणल्याची चर्चा जुन्या मोंढ्यात व्यापाऱ्यांमध्ये होती. कारण, मॉल, बडे व्यापाऱ्यांकडे जास्त भावातील साखरेचा मुबलक साठा शिल्लक आहे. भाव किलोमागे १ रुपयाने कमी झाले असले तरी व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

साखर उत्पादन वाढणारदरवर्षी साखर कारखाने एप्रिलपर्यंत सुरू राहतात. पण यंदा उसाच्या तुटवड्यामुळे जानेवारीच्या अखेरीस बंद होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंदी घातल्याने साखर कारखाने आता साखर उत्पादनावर लक्ष देतील व साखर उत्पादन वाढेल. महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १७२.२३ लाख क्विंटलपर्यंत होऊ शकते. यामुळे तेजीची शक्यता कमी आहे.- राजेश कासलीवाल, घाऊक व्यापारी

साखरेची किंमत:साखर ४ डिसेंबर ९ डिसेंबरक्विंटल ३९५०-४१५० रु ३८५०-४००० रु.किलो ४१-४२ रु ४०-४१ रु.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखानेAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी