शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

सिल्लोडच्या खंडहर क्वॉर्टरमध्ये तब्बल ५११ मतदार; किरिट सोमय्यांची निवडणूक विभागाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:37 IST

शिवसेनेच्या दबावात प्रशासनाने एका वॉर्डात इतर वॉर्डांतील नावे घुसवल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड नगर परिषदेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत पंचायत समितीच्या चार क्वाॅर्टरच्या पत्त्यावर तब्बल ५११ मतदार दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे चारही क्वाॅर्टर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. या क्वाॅर्टरमधील मतदारांची पाहणी करण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सोमवारी सिल्लोड येथे आले होते. शिवसेनेच्या दबावात प्रशासनाने एका वॉर्डात इतर वॉर्डांतील नावे घुसवल्याचा आरोप त्यांनी केला.

सिल्लोड पंचायत समितीच्या बंद असलेल्या चार क्वाॅर्टरमध्ये ५११ मतदार असल्याची माहिती मिळाल्यानंतर किरीट सोमय्या त्याची पाहणी करून तक्रार देण्यासाठी सोमवारी सिल्लोडमध्ये आले होते. दुपारी दोन वाजता त्यांनी क्वाॅर्टरची पाहणी केली. यानंतर उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार केली. प्रभाग क्रमांक आठमध्ये असलेल्या पं.स. क्वाॅर्टरमध्ये इतर प्रभागांतील विशिष्ट समाजाच्या ५११ मतदारांची नावे दाखवण्यात आली आहेत. ती पुन्हा त्यांच्या प्रभाग यादीमध्ये सामाविष्ट करावी, अशी मागणी सोमया यांनी केली. यावेळी भाजप प्रदेश सचिव सुरेश बनकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, जिल्हा सचिव कमलेश कटारीया, मंडळाध्यक्ष मनोज मोरेल्लू, माजी नगरसेवक विष्णू काटकर उपस्थित होते.

काय आहे प्रकरण?सिल्लोड शहरातील शाश्री कॉलनीच्या प्रभाग क्रमांक आठच्या भाग क्रमांक ३६४-१ पंचायत समिती क्वाॅर्टरमध्ये २८३२ ते ३३४३ क्रमांकापर्यंत मतदार यादीत ५११ नवीन आणि बोगस मतदारांची नावे घुसवल्याचा आरोप आहे. दरम्यान, प्रशासन मतदार याद्यांतील आक्षेप आणि आरोपांवर काय कार्यवाही करते, हे ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर स्पष्ट होईल.

साेमय्यांची वर्षभरात पाचवी सिल्लोड वारीसोमय्या यांची वर्षभरातील सिल्लोडची पाचवी भेट आहे. विधानसभा निवडणुकीनंतर न. प. व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत अनेक लोकांना कोणतेही कागदपत्रांचे पुरावे न बघता जन्म प्रमाणपत्र दिल्याचा, त्या दाखल्यांआधारे सिल्लोड शहरात व तालुक्यात राहत नसलेल्या ४ हजार ४०० लोकांची नावे मतदार यादीत आल्याचा आरोप केला होता. आता याद्यांतील मतदारांच्या हेराफेरीचा आरोप करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : 511 Voters Found in Abandoned Quarters; Somaiya Complains to Election Commission

Web Summary : Kirit Somaiya alleges 511 voters registered at abandoned quarters in Sillod. He claims names from other wards were added under political pressure, demanding correction of the voter list with authorities.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरKirit Somaiyaकिरीट सोमय्याElectionनिवडणूक 2024Abdul Sattarअब्दुल सत्तार