शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दलालांची संख्या वाढल्याने खतांची कृत्रिम टंचाई : हरिभाऊ बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:47 IST

करमाड येथे भाजपाचे रास्तारोको आंदोलन

ठळक मुद्देपीक विम्याचे पैसे ही तातडीने शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्याची मागणीअतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करावे

करमाड : महाआघाडी सरकारच्या अनेक फसव्या आश्वासनामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. बांधावर खत योजना सुध्दा फसवी आहे. उलट यामुळे खत विक्री प्रक्रियेत दलालांच्या संख्येत वाढ होऊन खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येऊन शेतकर्‍यांकडुन जास्तीचे पैसे लुबाडण्यात येत असल्याचा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला. सोमवारी औरंगाबाद तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार बागडे बोलत होते. 

सकाळी 11 वाजता भाजपचे आंदोलन सुरु झाले. यावेळी आ. बागडे यांनी भारतीय जनता पक्ष सत्तेवर असतांना खतासाठी शेतकर्‍यांना कधीही रांगा लावायची वेळ आली नाही तर कधी विमा कंपन्यांना भांडायची वेळ आली नाही अशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर चौफेर टीका केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे तात्काळ करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सोबतच पीक विम्याचे पैसे ही तातडीने शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्याची मागणी आ. बागडे यांनी यावेळी केली. तहसीलदार कृष्णा कानगुले यांन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे, तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, दामुअण्णा नवपुते, अशोक साळुंके, सजनराव मते, भावराव मुळे, गणेशराव दहिहंडे, तुकाराम तारो, दत्ता उकर्डे, रामकिसन भोसले, सजन बागल, सरसाबाई वाघ, अनिल हेरडे, दिनेश शेळके यांच्यासह शेतकर्‍यांचा सहभाग होता. 

वाहतूक खोळंबली आंदोलनकर्त्यांनी 45 मिनीटे महामार्गावर ठाण मांडल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. यावेळी काही शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले डाळिंब व टमाटे आंदोलनस्थळी आणले होते. 

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे