शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रयोगाला महिना झाला; पाऊस नाही कुणी पाहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 17:15 IST

कृत्रिम पावसासाठी उड्डाणावर उड्डाणे

ठळक मुद्देपडणारा पाऊस कृत्रिम की नैसर्गिक?१८ दिवस केले उड्डाण

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी ख्याती वेदर मॉडिफि केशनचे विमान उड्डाणावर उड्डाण घेत असून, त्यातून हाती काय लागले हे अद्याप महसूल प्रशासन आणि शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पडणारा पाऊस हा कृत्रिम आहे की नैसर्गिक, याचे स्पष्टीकरण आजवर दिलेले नाही. प्रयोगाला ९ सप्टेंबर रोजी महिना झाला. मात्र, पाऊस कुणी नाही पाहिला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

कृत्रिम पावसासाठी प्रयत्न केले जात असले, तरी त्यातून खूप काही हाती लागत नसल्याचे चित्र सध्या तरी आहे. विभागात आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ९ आॅगस्टपासून प्रयोगासाठी विमानाने रसायनांची फवारणी केली जात आहे. मात्र, किती पाऊस झाला, याचा अहवाल उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. 

९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रयोगाला एक महिना झाला आहे. १७ आॅगस्टपासून नियमित प्रयोगाला सुरुवात झाली. २६, २७ व २८ आॅगस्ट रोजी ढग नसल्यामुळे प्रयोग झाला नाही. २९ रोजी विमानाने १८ फ्लेअर्स ढगांमध्ये सोडण्यात आले. परभणी, जालना, बीड जिल्ह्यांतील ९ गावांवर हा प्रयोग करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी ३६ फ्लेअर्स ढगांमध्ये जाळण्यात आले. जालना, औरंगाबाद, बुलडाणा परिसरातील १८ गावांवर प्रयोग करण्यात आला. ३१ आॅगस्ट रोजी १६ फ्लेअर्स विमानाने ढगांमध्ये सोडले. जालना, बीड, अहमदनगर जिल्ह्यांतील १६ गावांवर हा प्रयोग करण्यात आला. १ सप्टेंबर रोजी २ वाजेच्या सुमारास सी-९० विमान आकाशात झेपावले. ५ वाजता ते विमान खाली उतरले. १२ फ्लेअर्स जाळण्यात आले. कृष्णपूर, पैठण, थेरगाव, बाभूळगाव, वैजापूर, फुलंब्री, निधोना, वानेगाव भागात हा प्रयोग करण्यात आला. २ सप्टेंबर रोजी २२ फ्लेअर्स बीडमधील १७ गावांवरील ढगात सोडले. ३ सप्टेंबर रोजी रेस्ट डे घेतल्यानंतर ४ रोजी २० फ्लेअर्स औरंगाबाद व बीडमधील १० गावांवरील ढगांत सोडण्यात आले. ५ रोजी २४ फ्लेअर्स बीड व परभणी जिल्ह्यांतील १२ गावांवर सोडले. ६ व ७ सप्टेंबर रोजी प्रयोग झाला नाही. ८ सप्टेंबर रोजी १४ फ्लेअर्स जालना, परभणी, बीड जिल्ह्यांतील ७ गावांवरील ढगांत सोडले. 

१८ दिवस केले उड्डाणकृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली असली तरी आजवर १८ दिवसच उड्डाण करण्यात आले आहे. २३५ फ्लेअर्स आजवर ढगांमध्ये सोडण्यात आले आहेत. औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांतील गावांवरील पाणीदार ढगांमध्ये प्रयोग करण्यात आला. त्यातून किती पाऊस झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. ९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत किती पाऊस झाला, याची नोंद अद्याप प्रशासनाने दिलेली नाही. 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय