शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

पंडित जसराजजींचे येणे एक उत्सव असायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:41 IST

पं. जसराज यांच्या आठवणींना दिला उजाळा 

ठळक मुद्दे पं. जसराज यांचे औरंगाबादेत अनेकदा येणे-जाणे बहुरंगी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वशास्त्रीय संगीतातील सूर्यास्त

औरंगाबाद : दवाखान्याचे उद्घाटन, मुलाचे लग्न किंवा अन्य काही कार्यक्रम अशा अनेक निमित्ताने पं. जसराजजी यांचे अनेकदा आमच्या घरी येणे झाले. ते जेव्हा घरी यायचे, तेव्हा सुरांचा आनंद मिळायचा तो  अनोखाच असायचा; पण त्यासोबतच त्यांचा एकंदरीतच सगळा वावर घराला उत्सवी स्वरूप देऊन जायचा,  अशा पं. जसराजजी यांच्या बद्दलच्या भावना डॉ. भवान महाजन आणि डॉ. छाया महाजन यांनी व्यक्त केल्या.  

पं. जसराजजी यांचे डॉ. महाजन यांच्या कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. या जिव्हाळ्याची नाळ जोडली गेली ती पैठण येथून. याबाबत सांगताना डॉ. महाजन म्हणाले की, त्यांचे वडील वैद्य तात्यासाहेब महाजन यांनी पं. जसराजजी यांच्या मोठ्या बंधूंना पैठण येथे गाण्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी पं. जसराजजीही त्यांच्या बंधूसोबत आले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे १० ते १५ वर्षांचे होते. त्यावेळी जसराजजी तबला वाजवायचे. यानंतर हे नाते अधिकाधिक दृढ होत गेले. 

शास्त्रीय संगीतातील सूर्यास्तसंगीतमार्तंड पं. जसराज म्हणजे शास्त्रीय संगीतातला वचक, दरारा होता. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीतातील सूर्यास्त झाला, असे वाटत आहे. माझे गुरुजी गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे नांदेड येथे ते वारंवार यायचे. मराठवाड्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. माझ्या गाण्याचे त्यांना फार कौतुक वाटायचे. आमचे गाण्याचे घराणे वेगवेगळे होते. त्यामुळे माझी गायनशैली त्यांच्यापेक्षा निराळी होती. असे असतानाही मी रचलेल्या अनेक बंदिशी त्यांनी ऐकल्या आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम केले.- पं. नाथराव नेरळकर

माझ्या गायनाचे त्यांनी कौतुक केले बडोद्याला गाणे शिकत असताना पं. जसराज यांचा गायनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नवोदित  कलाकार म्हणून मी केलेले गायन पं. जसराज यांना आवडले होते. त्यांनी माझ्या गायनाचे भरभरून कौतुक केले होते. कॉलेजमध्ये असताना त्यांचे गाणे मी खूप ऐकायचे. त्यांचे एक शिष्य माझ्यासोबत माझ्या महाविद्यालयातच होते. त्यांच्याकडूनही रियाजाच्या वेळी पंडितजींबद्दल खूप ऐकायला मिळायचे. त्यांच्यासारखे सूर लावणे जमावे म्हणून आम्ही सगळेच खूप मेहनत घ्यायचो.                                           - पं. शुभदा पराडकर

बहुरंगी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वप्रसन्न व्यक्तिमत्त्व व प्रसन्न गायकी अशा एका वाक्यात पं. जसराज यांचे वर्णन करता येईल. मेवाती घराण्याची सौंदर्यपूर्ण गायकी त्यांनी स्वीकारली, जोपासली आणि प्रसारित केली. लडिवाळ आलापी, तितकीच लडिवाळ सरगम आणि उत्तमोत्तम बंदिशी ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होती. आकाशवाणी येथे असताना अनेकदा त्यांच्याशी वार्तालाप करण्याचा योग आला. त्यातून त्यांच्या बहुरंगी आणि दिलखुलास स्वभावाचे दर्शन नेहमी होत असे. - पं. विश्वनाथ ओक 

त्यांनी जीवनाची कर्तव्यता साधलीदैवी गुणांचा ठेवा घेऊन पं. जसराज जन्माला आले. चंदनासारखा इतरांना सुगंधित करण्याचा गुण त्यांना लाभला होता. संगीतासारख्या श्रेष्ठ कलेतील उपासनेने त्यांनी ज्ञान आणि मोक्ष दोन्ही मिळवून जीवनाची कर्तव्यता साधली आहे. - ह.भ.प. अंबरीश महाराज देगलूरकर

उत्तुंग गायकी असणारे गायकशास्त्रीय गायनाचा इतिहास पाहिला तर उत्तुंग गायकी असणारे जे गायक होते, त्यांच्यापैकीच एक म्हणजे पं. जसराज. भावप्रधान गायकी, त्यांची बंदिशींची निवड अतिशय उत्तम असायची. त्या बंदिशीतला अर्थ उलगडून सांगायची जी शैली असते, त्यात पं. जसराज अग्रभागी होते. अगदी फोनवर बोलतानाही त्यांनी सहजपणे गायलेल्या दोन ओळी मनाला सुखावून जाणाऱ्या असायच्या.- डॉ. भवान महाजन 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmusicसंगीतDeathमृत्यू