संजय कुलकर्णी , जालनाजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोसंबीची आवक वाढली असून शनिवारी १०० टन आवक झाली. बाजारात तूर आणि गुळाची आवक कायम असून तुरीचे दर ५ हजार ६०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे अन्नधान्याची आवक तुलनेने कमी आहे. गव्हाचे दर १३६८ ते १५८० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेले आहेत. शाळू ज्वारी १२०० ते २०५०, हिरवी बाजरी १००० ते १४०० तर मक्याची विक्री १०४१ ते ११८१ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे होत आहे. पांढरी तूर ३५०० ते ६३५१, लाल तूर ४७११ ते ५६०० रुपये प्रतिक्विंटल या दराने विकली जात आहे. नवीन ज्वारीची आवक अल्प झाली असली तरी ओली ज्वारी असल्याने भाव १४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे आहेत.सध्या गुळाचा हंगाम सुरू असून आवकही चांगली आहे. गुळाचे दर २१४० ते २४५० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे आहेत. हरभरा २६०० ते ३४४५, सोयाबीन ३१०० ते ३३२५, उडीद ५२०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे विक्री होत आहे.
मोसंबीची आवक वाढली
By admin | Updated: February 8, 2015 00:09 IST