रांजणगावात दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:29+5:302020-12-17T04:31:29+5:30
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, पोहेकॉ.राजकुमार सूर्यवंशी आदींचे पथक १० डिसेंबरला वाळूज उद्योगनगरीत गस्त घालत ...

रांजणगावात दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा जेरबंद
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, पोहेकॉ.राजकुमार सूर्यवंशी आदींचे पथक १० डिसेंबरला वाळूज उद्योगनगरीत गस्त घालत होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास मोटारसायकल (क्रमांक एम. एच.१२, ए.एल१३८४)वरुन संशयितरित्या फिरणाऱ्यास पथकाने अडवूृन त्याची चौकशी केली. या चौकशीत त्याने आपले नाव कालीदास ज्ञानेश्वर दहीवाल (४०) असल्याचे सांगितले. रांजणगावात भाड्याच्या घरात राहत असून दुचाकीची कागदपत्रे गावी असल्याचे त्याने सांगितले. या दुचाकीस्वाराचा संशय आल्याने पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेऊन आरटीओकडे चौकशी केली असता वाहनावरील (क्रमांक एम. एच. १२, ए. एल १३८४) हा दुसऱ्या मोटारसायकलचा असून ही दुचाकी संभाजी ज्ञानेश्वर दहीवाल याच्या नावे असल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. कालीदास दहीवाल याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.