शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'इम्तियाज जलीलांना अटक करा'; छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चातून आंदोलकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:56 IST

क्रांती चौक येथून निघून मोर्चाचा समारोप भडकल गेट येथे झाला.

छत्रपती संभाजीनगर : माजी खा. इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला; परंतु पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही. त्यांना अटक करावी या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आज, सोमवारी ( दि. २३ ) छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौक येथून निघून मोर्चाचा समारोप भडकल गेट येथे झाला.

माजी खा. जलील यांनी ११ जून रोजी पत्रकार परिषदेत अपशब्दाचा वापर करून बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर क्रांती चौक, बेगमपुरा, उस्मानपुरा पोलिस ठाणे आदी ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; परंतु त्यांना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय, अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. मोर्चास आज दुपारी १२ वाजता क्रांती चौक येथून सुरुवात झाली. मोर्चात वाळूज महानगरातील बजाजनगर, वाळूज, पंढरपूर, वडगाव (को.), घाणेगाव, रांजणगाव, करोडी, साजापूर, तीसगाव, जोगेश्वरी, शहरातील क्रांतीनगर, उस्मानपुरा, इंदिरानगर, गारखेडा, संसारनगर, समतानगर आदी वस्त्यांमधून व कन्नड, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री, पैठण, वैजापूर, लासूर स्टेशन, करमाड आदी ठिकाणचे हजारो आंदोलक निळा झेंडा खांद्यावर घेऊन सहभागी झाले. तर अनेकांच्या हातात इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी करणारे फलक होते. मोर्चाचे एक टोक पैठण गेट तर शेवटचे टोक क्रांती चौकात होते. सिल्लेखाना, गुलमंडीमार्गे जाऊन भडकल गेट येथे मोर्चाचा समारोप झाला.

जलील यांच्यावर नेत्यांची सडकून टीकामोर्चाचे भडकल गेट येथे सभेत रूपांतर झाले. यावेळी शहरातील विविध आंबेडकरी नेत्यांनी माजी खा.  इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली. जलील यांनी आंबेडकरी समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले, समाजाने पैशांसाठी मते विकल्याचे म्हणत वारंवार अवमान केला, आमदार-खासदार असताना दलित वस्तीच्या निधीत जलील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही नेत्यांनी केला. तर आंदोलकांनी ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जलील यांना तत्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी केली.

मोर्चाच्या मागे पालकमंत्री शिरसाट, माजी खा. इम्तियाज जलील यांचा आरोपसरकारी कागदपत्रांमध्ये जे नमूद आहे त्याचेच वाचन मी केले. हे सर्व प्रकरण पालकमंत्री शिरसाट यांच्या भ्रष्टाचाराचे आहे. यावर कोणी बोलायला तयार नाही. मी कोणत्याही समाजाचा अवमान केला नाही. मोर्चातील गर्दी पैसे देऊन आणलेली आहे, याच्या मागे पालकमंत्री शिरसाट असल्याचा आरोप माजी खा. इम्तियाज जलील यांनी मोर्चावरील प्रतिक्रिया देताना केला.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलSanjay Shirsatसंजय शिरसाटagitationआंदोलनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर