शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सलाईन लावण्यावरून वाद; जिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांना नातेवाइकाची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:11 IST

रुग्णालयात काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

छत्रपती संभाजीनगर : रुग्णाला लावलेली सलाईन ‘आऊट’ झाल्यानंतर ती पुन्हा टोचण्यावरून वाद घालत रुग्णाच्या नातेवाइकाने निवासी डाॅक्टरला मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. या घटनेनंतर निवासी डाॅक्टरांच्या मार्ड संघटनेने संताप व्यक्त करीत रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत तक्रार करावी, अन्यथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांची पोस्टिंग नाकारली जाईल, असा पवित्रा घेतला.

जिल्हा रुग्णालयात मेडिसीन विभागाच्या वार्ड क्रमांक-२०३ मध्ये एका महिलेवर उपचार सुरू आहेत. महिला रुग्णाला लावलेली सलाईन ‘आऊट’ झाल्यानंतर ती पुन्हा टोचण्यावरून रुग्णाच्या नातेवाइकांनी कर्तव्यावरील निवासी डाॅक्टरसोबत वाद घातला आणि मारहाण केली. डाॅक्टरांनी या प्रकाराचा व्हिडिओ काढला. तेव्हाही नातेवाइकाने शिवीगाळ केली. त्यामुळे रुग्णालयात काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘डीएमओं’कडून पोलिसांत तक्राररुग्णाच्या नातेवाईक आणि निवासी डाॅक्टरमध्ये वाद झाला. याप्रकरणी ड्युटी मेडिकल ऑफिसर (डीएमओ) यांच्याकडून पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे.- डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक

... तर जिल्हा रुग्णालयात पोस्टिंगला जाणार नाहीया घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून गंभीरता न दाखविता संबंधित डॉक्टरनेच स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी, असा सल्ला देण्यात आला. ही भूमिका अत्यंत निषेधार्ह असून, डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती धोकादायक ठरू शकते. २४ तासांत एफआयआर नोंदवला नाही, तर जिल्हा सामान्य रुग्णालयात आम्ही पोस्टिंगसाठी जाणार नाही.- डाॅ. ऋषिकेश देशमुख, अध्यक्ष, मार्ड संघटना

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर