छत्रपती संभाजीनगर : एमआयएमने दोन दिवसांपूर्वीच शहरातील आठ उमेदवारांची घोषणा केली. यात प्रभाग क्रमांक १२ मधील पक्षाचे अधिकृत उमेदवार मोहमद असरार यांनी शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता किराडपुरा भागातून रॅली काढली. तिकीट न मिळालेल्या माजी नगरसेविका नसीम बी सांडू खान यांचा मुलगा हाजी इसाक यांचे समर्थक असरार यांच्या रॅलीत पोहोचला. त्यांना उमेदवारीबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्यात बाचाबाची झाली. तणावसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर वातावरण शांत झाले.
मुस्लीमबहुल भागात एमआयएम पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा आहे. बंडखोरीच्या भीतीने राजकीय पक्षांनी उमेदवारीची घोषणा केली नाही. मात्र, एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काही उमेदवारांची घोषणा करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. घोषित उमेदवारांपैकी प्रभाग १२ क (खुला प्रवर्ग) मधील उमेदवार मोहमद असरार यांनी शुक्रवारी सायंकाळी किराडपुरा राममंदिर रोडवरून रॅली काढली. रॅलीत उमेदवार आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात होते. मंदिरासमोर रॅली येताच इच्छुक उमेदवार हाजी इसाक यांचे समर्थक तेथे पोहोचले. असरार आणि समर्थकांमध्ये जुंपली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उमेदवार हारतुऱ्यासह थोडे पुढे सरकले. विरोधामुळे असरार यांना रॅली बंद करावी लागली. एमआयएमने असरार यांना दिलेल्या उमेदवारीचा फेरविचार करावा, अशी मागणी हाजी इसाक समर्थकांनी केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. एमआयएम पक्षातील दोन्ही गट जिन्सी पोलिस ठाण्यात पोहोचले. या घटनेप्रकरणी सायंकाळी अफसर खान हुसेन खान यांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या तिघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद करण्यात आली. तर रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या गटाकडून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे पाेलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले.
खुल्या प्रवर्गातून दावाप्रभाग क्रमांक १२ मधील क हा खुला प्रवर्ग आहे. तेथून मी उमेदवारी मागितली होती. संपूर्ण तयारी केली. ऐनवळी दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली. आता पक्षाने मला ओबीसी महिला प्रवर्गातून लढण्याचा सल्ला दिला. यापूर्वी मी आईला निवडून आणले. आता परत महिला प्रवर्गातून का निवडणूक लढवावी. पक्षाने न्याय द्यावा, अशी विनंती इम्तियाज जलील यांच्याकडे केली.- हाजी इसाक खान, इच्छुक उमेदवार
पक्षाचा निर्णय, माझा नाहीपक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी मला उमेदवारी घोषित करण्याचे आदेश दिले. मी त्यानुसार उमेदवारी घोषित करीत आहे. कोणाला उमदेवारी द्यायची हा निर्णय कोअर कमिटी आणि पक्ष ठरवत असतो. उमेदवारी निश्चित करणे हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही.- इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष, एमआयएम
Web Summary : MIM workers clashed in Chhatrapati Sambhajinagar over candidate selection. Supporters protested, leading to police intervention and a minor scuffle. Tensions remain high.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में उम्मीदवार चयन को लेकर एमआईएम कार्यकर्ताओं में झड़प हो गई। समर्थकों ने विरोध प्रदर्शन किया, जिसके कारण पुलिस को हस्तक्षेप करना पड़ा और मामूली हाथापाई हुई। तनाव अभी भी अधिक है।