रानफुलांनी बहरणार अजिंठा लेणीचा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:04 AM2021-06-21T04:04:37+5:302021-06-21T04:04:37+5:30

ह्यू पॉईंट जवळविविध फुल झाडांचे बीजारोपण* सिल्लोड/ पिंपळदरी : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या सौंदर्यात भर पडून पर्यटन व्यवसायाला अधिक चालना ...

The area of Ajanta Caves will be covered with flowers | रानफुलांनी बहरणार अजिंठा लेणीचा परिसर

रानफुलांनी बहरणार अजिंठा लेणीचा परिसर

googlenewsNext

ह्यू पॉईंट जवळविविध फुल झाडांचे बीजारोपण*

सिल्लोड/ पिंपळदरी : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या सौंदर्यात भर पडून पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळावी, यासाठी अजिंठा लेणी परिसरात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांच्या झकास पठार या संकल्पनेतून रविवारी अजिंठा येथील ह्यू पॉंइंट येथे विविध फुलांचे बीजारोपण करण्यात आले.

अजिंठा डोंगर रांगात दुर्मिळ वनस्पती असलेल्या २५ लाख वृक्षांची लागवड करणे, ह्यू पॉइंट येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी नवीन व्यापार संकुल निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिल्या. सत्तार यांनी स्वत: यावेळी ट्रॅक्टर चालवून जमीनीची मशागत केली. यावेळी जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, शिवसेना तालुका प्रमुख देविदास लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, सरपंच सुरय्या तडवी, अशोक सूर्यवंशी, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, सुदर्शन तुपे, स. गटविकास अधिकारी ज्योती राठोड, प्रादेशिक वनाधिकारी अनिल मिसाळ, अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगदरे हजर होते.

फोटो :

200621\img-20210620-wa0242.jpg

1)अजिंठा लेणीच्या व्ह्यु पॉईंटवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध फुलांच्या झाडांचे बीजारोपण करण्यात आले. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, देविदास लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे,वनाधिकारी एस.पी. मांगदरे, अनिल मिसाळ ,सरपंच सुरया तडवी, अशोक सूर्यवंशी, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे , सुदर्शन तुपे, ज्योती राठोड, दिसत आहे.

2) बीजारोपण करण्यासाठी जमिनीची माशागत करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ट्रॅक्टरवर त्यांच्या मागे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, वनपरिक्षेत्र अधिकारी मांगदरे बसले होते.

Web Title: The area of Ajanta Caves will be covered with flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.