शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लाडोबासाठी खरीदलेली खेळणी बीएसआय प्रमाणित आहेत का ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 19, 2024 13:29 IST

देशात बीएसआय व आयएसआय नसलेल्या खेळणी विक्रीवर बंदी आहे.

छत्रपती संभाजीनगर : तुमच्या लाडक्या मुला-मुलींसाठी दुकानातून खेळणी खरेदी करता. मात्र, त्या खेळणी बीएसआय प्रमाणित, आयएसआय मार्कच्या आहेत का, याची तपासणी केली का... नसेल तर यापुढे खेळणी खरेदी करताना सजग व्हा... कारण, देशात बीएसआय व आयएसआय नसलेल्या खेळणी विक्रीवर बंदी आहे.

बनावट खेळण्यांची विक्री होऊ नये म्हणूननिकृष्ट वस्तूंपासून बनविलेल्या खेळणींमुळे मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला धोका पोहोचू नये, बाजारात बनावट खेळण्यांची विक्री होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार १ जानेवारी २०२१ पासून भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व खेळण्यांवर भारतीय मानक ब्युरोचे (बीएसआय) सुरक्षिततेविषयक प्रमाणपत्र व इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट (आयएसआय) मार्क असणे बंधनकारक आहे. १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठीच्या इलेक्ट्रिक आणि नॉन इलेक्ट्रिक खेळण्यांचा यात समावेश होतो.

बाजारात किती खेळण्यांवर आयएसआय मार्कखेळणी व्यापाऱ्यांनी सांगितले की, शोरूममध्ये मिळणाऱ्या ९५ टक्के खेळण्यांवर बीएसआय प्रमाणित व आयएसआय मार्क आहेत. विक्री होणाऱ्यांपैकी ५ टक्के खेळणी अजूनही आयएसआय मार्क नाहीत. हातगाड्यांवर, रस्त्यांवर बिगर आयएसआय मार्क खेळणी सर्रास विक्री होतात.

किती ग्राहक सजग असतात?खेळणी खरेदी करताना ४० टक्के ग्राहक हे सजग असतात. ते खेळणीच्या पॅकिंगवरील मार्क आहेत का ते बघतात व मगच खेळणी खरेदी करतात. मात्र, ६० टक्के ग्राहकांना या बदल माहितीच नसल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले. मुलांना खेळणी आवडली की, ती खरेदी केली जाते. बीएसआय प्रमाणित आहे का ते बघितले जात नाही.

खेळणी बाजारावर मेड इन इंडियाचा दबदबापूर्वी भारतीय खेळणी बाजारपेठेवर ‘मेड इन चायना’ने मुसंडी मारली होती. जिकडे तिकडे चिनी खेळणी दिसत होत्या. मात्र, खेळणीवर बीएसआय प्रमाणित व आयएसआय मार्क असणे सक्तीचे करण्यात आले. आयात शुल्क वाढविण्यात आला आणि मागील तीन वर्षांत मोठा बदल घडून आला. खेळणी बाजारपेठेवर आता भारतीय खेळणी उद्योगाचा दबदबा निर्माण झाला आहे. खेळणीची आयात घटली व आता निर्यात वाढली आहे. भारतीय मोठ्या, लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगाने दर्जेदार खेळणी तयार करून ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.

मेड इन इंडिया खेळणी द्या५ वर्षांआधी स्वस्तातील मेड इन चायना खेळणी द्या असे ग्राहक म्हणत होते. पण आता मानसिकता बदलली असून ‘मेड इन इंडिया’ खेळणी दाखवा, असे ग्राहक सांगत आहेत.- सुमित मोटवाणी, खेळणी वितरक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkidsलहान मुलं