शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरात ब्रिजवाडीतील जमिनीवर माफियांचा डोळा? महसूल यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:55 IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतलगत ब्रिजवाडीतील सर्व्हे क्रमांक एकची गट क्र. ३० मधील क्षेत्रफळ ५४ एकर ३० गुंठे गायरान जमीन आहे.

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीलगतची ब्रिजवाडीतील कोट्यवधींची ५४ एकर ३० गुंठे गायरान जमीन हडपण्याचा डाव विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, शिक्क्यांचा वापर करून होत असल्याचे प्रकरण शनिवारी चव्हाट्यावर आल्यामुळे महसूल यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतलगत ब्रिजवाडीतील सर्व्हे क्रमांक एकची गट क्र. ३० मधील क्षेत्रफळ ५४ एकर ३० गुंठे गायरान जमीन आहे. १० जून २०२५ साली महसूल मंत्रालयातून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला एक पत्र आले. याबाबत चौकशीसह निर्णय घ्या, अशा सूचना पत्रात होत्या. तेव्हापासून आजवर त्यात निर्णय घेतला नाही. त्या जमिनीची संचिका प्रशासनाच्या कस्टडीत असताना त्यातील सगळी माहिती भूमाफियांपर्यंत कशी पोहोचली, असा प्रश्न आहे.

मागील वर्षभर त्या जमिनीची अनेकांनी खरेदी-विक्रीच्या अनुषंगाने, गुंतवणुकीच्या हेतूने पाहणी केली असून त्या जमिनीची कागदपत्रे बाहेर काही दलालांकडे असल्याचे वृत्त आहे. गायरान, सिलिंगसह वादात असलेल्या जमिनीत गुंतवणूक करण्याचा उद्योग करणारी एक बडी टोळी शहरात सक्रिय आहे. त्यातूनच ब्रिजवाडीतील जमिनीचा हा सगळा खेळ झाल्याची चर्चा आहे. वर्ग-२ मधील जमिनी घ्यायच्या, प्रशासनातील म्होरक्यांना हाताशी धरायचे आणि जमीन वर्ग-१ मध्ये बदल करून घ्यायचा, असा प्रकार सध्या जोरात सुरू आहे. मे महिन्यात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर व महसूल सहायक दिलीप त्रिभुवन यांना निलंबित व्हावे लागले.

संचिकेवर निर्णय नाही१९६२ साली ब्रिजवाडीतील गट क्र. ३० मधील ५४ एकर ३० ही जमीन शासनजमा आहे. २०१४ साली मूळ मालकाने ज्याच्याकडून जमीन शासनाकडे जमा झाली होती. त्यांच्या वारसांनी पाॅवर ऑफ ॲटर्नीच्या आधारे एक अर्ज महसूल प्रशासनाकडे आला. ते प्रकरण महसूल मंत्रालयापर्यंत गेले. १० जून २०२५ साली महसूल मंत्रालयातून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला एक पत्र आले. याबाबत चौकशीसह निर्णय घ्या, अशा सूचना पत्रात होत्या. तेव्हापासून आजवर त्यात निर्णय घेतला नाही. यात दोन पक्षकार आहेत. त्यातील दोघांवर एकमेकांचे आक्षेप आहेत. मुखत्यारनामा दोघांकडे असल्याचा दावा ते करतात. बनावट आदेश परस्पर बनविला आहे. महसूलचे आदेश असे नसतात. सध्या ५४ एकर ३० गुंठ्यांची जमीन गायरान म्हणून सातबारावर नोंद आहे. ज्याच्या नावाने बनावट आदेश झालेले आहेत, त्यानेच हा उद्योग केला आहे.- डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी.

English
हिंदी सारांश
Web Title : Land mafia targets Bridgewadi land in Sambhajinagar; revenue system under suspicion.

Web Summary : Forged documents were used to grab Bridgewadi's 54-acre land. Revenue officials are suspected of involvement in the scam. An investigation is ongoing.
टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरChikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसी