शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबीचा धक्का लागून जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाण्याची नासाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 18:37 IST

पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील पिंपळवाडी फाट्यावरील घटना, रस्त्याला आले नदीचे स्वरूप

जायकवाडी: जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आज दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंपळवाडी फाट्यावर फुटली. यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. तसेच रस्त्यावरील दुकानात पाणी गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.

जायकवाडी धरणातून शेंद्रा एमआयडीसीला ९०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जातो. आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान येथे जेसीबीच्या सहाय्याने पाइपलाइन दुरूस्तीचे काम सुरू होते. यावेळी जेसीबीचा धक्का लागल्याने शेंद्रा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लागलीच पाण्याचा उंच फवारा उडाला, लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. पाण्याचा फवारा आणि रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक एक तास खोळंबली होती.

दरम्यान, पाण्याच्या वेगवान फवाऱ्याने परिसरातील दुकानांवरील पत्रे उचकटले. तर काही दुकानांतील पत्र्यांना छिद्रे पडले. तसेच शटरच्या खालील भागातून पाणी आत शिरल्याने दुकानातील मालाचे व वस्तूंचे नुकसान झाले. एक तासानंतर जायकवाडी येथील पंप हाऊसमधील कर्मचाऱ्यांनी पाणी बंद केले. 

पाच ते सहा दुकानांमध्ये शिरले पाणी...पिंपळवाडी फाट्यावरील ओमप्रकाश बिश्नोई यांच्या मिठाई दुकानामध्ये पाणी शिरल्याने फ्रीज जळाले व मिठाई मालाचे नुकसान झाले. तसेच जावेद शेख यांच्या दुकानातील कॉम्प्युटर , प्रिंटर भिजून खराब झाले. जनता इलेक्ट्रिकल दुकानातील सिंमेट बॅग, प्लंबिग मटेरियल पाण्यात भिजून खराब झाले. तसेच प्रकाश जाट यांच्या भोलेनाथ आईस्क्रीममधील दोन फ्रीज जळाले. यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.- मुश्ताक शेख (व्यापारी)

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद